राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

  16

मुरबाड : मुरबाड येथील माळशेज-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नढई मंदिराच्या मागे व नढई-नारीवलीकडे वळण घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. गेले अनेक दिवस हे खड्डे असेच असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी किंवा मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा प्रश्न या भागातील नागरिक करत आहेत. या भागातील नागरिकांना प्रवासासाठी एकमेव हाच मार्ग असून रोज शेकडो मोटारसायकल व इतर वाहने या रस्त्यावर ये-जा करत असतात.


या रस्त्यावर दररोज शेकडो डंपर, खडीची वाहतूक करतात. त्यामुळे या पूर्ण रस्त्याची वाताहात झाली आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहनांची येथे वाहतूक होत असते; परंतु आरटीओ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दरम्यान संबधित प्रशासनाने मंदिरा पाठीमागे पडलेले खड्डे त्वरित भरले नाहीत, तर या खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Comments
Add Comment

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

लोप पावलेला नाट्य-खजिना : भांगवाडी थिएटर

भालचंद्र कुबल : पाचवा वेद लुप्त झालेल्या नाट्य-खजिन्याबाबतचा हा उत्तरार्ध लिहिताना एक जाणीव मात्र नक्की झालेली

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

'एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही'

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

गर्भधारणेपूर्व तपासणीचे महत्त्व

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील प्रक्रिया