मुंबई : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात शाब्दिक चकमक झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.
मुंबई : गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून घोषित करणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अधिवेशनात केली. राज्यात ...
बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास
अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूराजे देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराजे यांचा पारा चढल्याचे दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास असा एकेरी उल्लेख करत अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये विधान परिषदेचे काम १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातील वाद चांगलाच रंगला आहे. विधान परिषदेमध्ये मराठी माणसांच्या घरांवरून ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये अनिल परब, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अनिल परब, राजेश राठोड, हेमंत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसांच्या मुद्द्यावरूनच चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि एकमेकाला आव्हान देण्याची भाषा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं.