Vedanta Report: Adani यांच्यानंतर आता Vedanta टार्गेटवर? Short Seller Viceroy Research कडून गंभीर आरोप Vendanta,Hindustan Zinc कंपनीचा शेअर ८% ने Crash

  75

प्रतिनिधी: वेदांन्ता समुहाचा समभाग (Share) ८% कोसळला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.व्हाइसरॉय रिसर्चने (Viceroy Research) कंपनीवर गंभीर आरोप केल्यानंतर समुहाबद्दल भावना नकारात्मक झाल्याने शेअर्सची घसरगुंडी झाली. अनिल अग्रवाल यांच्या वेदांन्ता व हिंदुस्थान झिंक दोन्ही कंपन्यांच्या समभागात ८% घसरण झाली. इंट्राडेमध्ये ७.७% नुकसान समभागांना झाले आहे. तर हिंदुस्थान झिंक समभागात इंट्राडेत ४.५% हून अधिक नुक सान झाले. व्हाइसरॉय रिसर्च या अमेरिकेन रिसर्च शॉर्ट सेलर कंपनीने वेदान्ता समुहावर आरोप करत कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे सुतोवाच केल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये फटका बसला.' कमजोर व्यवस्थापन (Mismanage ment) असा उल्लेख केल्याने ही बातमी वारे वाहिल्यासारखी पसरली. मात्र वेदांन्ता समुहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

व्हाइसरॉयने असा दावा केला की 'वेदांताला घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे वाढत्या लेव्हरेजचा वापर करावा लागला आणि राखीव निधी कमी करावा लागला, ज्यामुळे समूहाच्या प्राथमिक तारणाचे मूल्य कमकुवत झाल आहे. व्हाईसरॉयने ९ जुलै रोजीच्या त्यांच्या अहवालात वेदांताची पालक कंपनी व्हीआरएलची तुलना नेमक्या शब्दात उपकंपनी वेदांताकडून रोख रकमेच्या हस्तांतरणाद्वारे जिवंत ठेवल्या जाणाऱ्या "आर्थिक झोम्बी" किंवा "परजीवी" शी केली आहे बीएसईवर (BSE) उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मार्चपर्यंत वेदांतातील प्रवर्तक हिस्सा (Promoter Holdings) ५६.३८% आहे. उल्लेखनीय म्हणजे जवळजवळ संपूर्ण इक्विटी तारण आहे म्हणजेच शेअर्स कर्जदारांकडे तारण म्हणून आहेत.

याशिवाय रिसर्च कंपनीने असे म्हटले आहे की, मोठ्या अघोषित देणग्या पुढे ढकलल्या आणि कर्जमुक्त राहण्यासाठी नवीन कर्ज आणि लेखा समायोजनांवर अवलंबून राहिले. त्यांनी इशारा दिला की समूहव्यापी दिवाळखोरीची घटना आता दूरचा धोका नाही.' असे रिसर्च कंपनीने म्हटले आहे.

वेदान्तांने याविषयी नक्की काय म्हटले?

व्हाईसरॉय रिसर्च रिपोर्टच्या संदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात वेदान्ता समुहाने म्हटले आहे की, हा अहवाल ग्रुपला बदनाम करण्यासाठी निवडक चुकीच्या माहितीचे दुर्भावनापूर्ण नियोजन केले आहे. हा अहवाल निवडक चुकीची माहिती आणि निराधार आरोपांचे दुर्भावनापूर्ण मिश्रण आहे जे समूहाला बदनाम करण्यासाठी केले गेले आहे. खोटा प्रचार निर्माण करण्याच्या एकमेव उद्देशाने आमच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही प्रयत्न न करता तो अहवाल छापण्यात आला. या अहवालात विविध माहितीचे संकलन आहे - जे आधीच सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध आहे, परंतु लेखकांनी जाणूनबुजून बाजारातील प्रतिक्रियेतून नफा कमावण्यासाठी संदर्भाला खळबळजनक (Sensational) बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

अहवालाचे टाईमिंग संशयास्पद आहे आणि ती आगामी कॉर्पोरेट उपक्रमांना कमजोर करण्यासाठी डाव असू शकतो. आमचे भाग भांडवलधारक (Stakeholders) अशा युक्त्या समजून घेण्याइतके समजूतदार आहेत. खरं तर, कोणतीही जबाबदारी टाळण्यासाठी, अहवालाच्या लेखकांनी विविध अस्वीकरण (Disclaimer) जोडले आहेत की हा अहवाल केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी तयार केला गेला आहे आणि त्यांचे मत व्यक्त करतो. आम्ही व्यवसाय आणि वाढीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि सर्वांना अटकळ आणि अप्रमाणित आरोप टाळण्याची विनंती करतो ' अशा शब्दांत वेदांन्ता समुहाने नाराजी व्यक्त केली.

यापूर्वी गौतम अदानी यांच्यावर युएस शॉर्ट सेलर हिंडनबर्गने अदानी समुहावर समभागावरील हाताळणी व पैशाचे गैरव्यवहार याविषयी गंभीर आरोप केले होते. मात्र अदानी समुहाने हे सगळे आरोप भारतीय बाजाराविरूदध हे षडयंत्र असल्याचे म्हणत त्यात काही तथ्य नसल्याचे सांगितले होते. यानंतर अदानी यांच्यावर झालेल्या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नव्हते.
Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची