निकृष्ट डाळ बघून शिवसेना आमदाराने केली वेटरची धुलाई

मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मुंबई बाहेरचे आमदार आकाशवाणी आमदार निवासामध्ये वास्तव्यास आहेत. याच आमदार निवासात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदारा निवासाच्या कँटिनमधून जेवण मागवले होते. या जेवणात निकृष्ट दर्जाच्या डाळीचा वापर करण्यात आल्याचे बघून आमदार संजय गायकवाड संतापले. त्यांनी निकृष्ट डाळीबाबतचा राग कँटिनच्या वेटरवर काढला. आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या वेटरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या कृतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. निकृष्ट अन्न देऊन कँटिन प्रशासन आमदारांच्या जिवाशी खेळत आहे. याचाच राग आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तर आमदाराने वेटरला मारझोड करणे चुकीचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले. यामुळे बुधवार ९ जुलै रोजी अधिवेशनात या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

बांगलादेशातील हिंदूच्या हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

ढाका : बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून

नवी मुंबईत शरद पवार गटाला मोठा धक्का; संदीप नाईक भाजपमध्ये

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे

विक्रोळी ते भांडुप मध्ये सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

चीनकडून बांगलादेशात लष्करी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ

नवी दिल्ली  : भारताला घेरण्यासाठी चीनने पाकिस्ताननंतर आपले लक्ष आता बांगलादेशवर केंद्रित केले आहे.