ब्रिटिश-फ्रेंच SEPECAT जग्वार सुपरसॉनिक विमान भारताने १९७० च्या दशकात खरेदी केले होते. यातलेच एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. हा यंदाच्या वर्षातला जॅग्वार लढाऊ विमानाचा तिसरा अपघात आहे. पहिला अपघात याच वर्षी ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ झाला होता.
चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ कोसळलेल्या विमानाचे राजस्थानच्या सुरतगड हवाई दल तळावरून उड्डाण झाले होते.
भारताकडे किमान १२० सक्रीय जॅग्वार लढाऊ विमानांचा ताफा आहे. या जुन्या विमानांपैकी अनेक विमानांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. कोसळलेले विमान हे आधुनिकीकरण केलेल्या विमानांपैकी होते की जुन्या जॅग्वारपैकी होते हे अद्याप समजलेले नाही.
याआधी एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये कोसळलेल्या जॅग्वार विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आणि सहवैमानिक जखमी झाला होता तर पंजाबमध्ये कोसळलेल्या विमानामुळे जीवितहानी झाली नव्हती.