काय म्हणाले आमदार प्रवीण दरेकर?
आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, राष्ट्रीय जलगुणवत्ता मोजमाप योजनेनुसार जे सर्वेक्षण केले त्यामध्ये ५६ नदीपट्ट्यांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी एमआयडीसी आहेत. महाड, माणगाव, रोहा, खेड, चिपळूण येथे केमिकल कंपन्या आहेत. येथील सर्व नद्यामध्ये केमिकलचे पाणी जाते. त्यामुळे माशांवर परिणाम होतो. त्यावर ऍक्शन प्लॅन नाही. ज्या केमिकल कंपन्या आहेत व बाजूला ज्या नद्या आहेत त्या प्रदूषित होऊ नयेत. यासंदर्भात सर्वकष केमिकल कंपनी, एमआयडीसी यांचा आढावा घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना शासन करणार का? असा सवाल केला.
दरेकरांच्या प्रश्नावर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, विशेष उपाययोजना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार यांचा संवाद असेल तर त्याचा फायदा होतो. या नद्यांचे मोजमाप केले असून भव्य निधी केंद्राने दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नद्यांच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतलाय. राज्य त्या नेतृत्वाखाली काम करतेय. दरेकर यांनी सांगितलेल्या नद्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, असे उत्तर दिले.