कर्नाक पुलाचे नाव आता सिंदूर पूल, पुलाच्या नामकरणाचा मुहूर्त ठरला

  59

मुंबई (खास प्रतिनिधी): मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला बोडणारा कर्नाक उझणपुलाचे बांधकाम पूर्णझाले आहे. या पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा असतानाच आता पुलाचे नामकरण सिंदूर असे करण्यात येत आहे. या नामकरणाचा प्रस्तावाच्या मंजुरी अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने या नामकरणानंतर या सिंदूर (कर्नाक) पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग खुला झाला आहे.


दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. या पुलाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे.


या पुलाचे बांधकाम प्रथम में महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, त्यानंतर ही कामे १० जूनपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने रेल्वेकडे एनओसीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता; परंतु रेल्वेची एनओसी प्राप्त न झाल्याने या पुलाचे लोकार्पण लांबणीवर पडले होते. अखेर मागील बुधवारी २५ जून २०२५ रोजी संध्याकाळी या पुलासाठीची एनओसी प्राप्त झाली आहे. त्यानंतर या पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. या पुलाला ब्रिटीश व्यक्तीचे नाव दिलेले आहे.


कर्नाक हे एका ब्रिटीश गव्हर्नरचे नाव असून ते बदलण्याच्या विचार होता. त्यादृष्टिकोनातून कुलाबा विधानसभेचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर मांनी या पुलाचे नाव सिंदूर असे करण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार या नामकरणाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचीप प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. या नामकरणाची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाल्यानंतर याचे लोकार्पण तातडीने केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता हे पूल कर्नाक नाही, तर सिंदूर पूल मा नावाने ओळखले जाणार असे बोलले जात आहे.



उद्या होणार मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण


मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डीमेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपुलाचे यांधकाम पूर्ण झाले असून या पुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानुसार ही कामे पूर्ण झाल्यानंतरही लोकार्पणाच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे असतानाच आता पुलाचे नामकरण सिंदूर असे करण्यात आले आहे. या नामकरणाचा प्रस्तावाच्या मंजुरी अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने या नामकरणानंतर या सिंदूर (कर्नाक) पूलाचे लोकार्पण येत्या येत्या गुरुवारी १० जुलै २०२५ रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक