AMFI Mutual Fund marathi news: म्युच्यल फंड गुंतवणूकीत जून महिन्यात रेकॉर्डब्रेक वाढ ! SIP गुंतवणूकीत नवा उच्चांक! जूनमधील Inflow ' इतक्या ' कोटींवर

प्रतिनिधी:असोसिएशन ऑफ म्युचल फंड फंड ऑफ इंडिया (The Association of Mutual Fund AMFI) या मंडळाने आज म्युचल फंडाने जून महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. माहितीनुसार, जून महिन्यातील म्युचल फंड आवक (Mutual Fund Inflow) मध्ये महिना बेसिसवर (Month on Month Basis MoM)  २४% वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्यात म्युचल फंड गुंतवणुकीचे मूल्यांकन २३५८७ कोटींच्या घरात पोहोचले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एसआयपी (Systematic Investment Plan SIP) यामध्ये नवा उच्चांक गाठला आहे. महिना बेसिसवर आवक मागील महिन्यातील २६६८८ कोटींवरून वाढत जून महिन्यात २७२६९ कोटीवर पोहोचली आहे.


अधिकृत माहितीनुसार, एकूण नवीन ६१.९१ लाख नवे एसआयपी सदस्य जोडले गेले आहेत. त्यामुळे म्युचल फंड मूल्यांकन तब्बल जून महिन्यात ८.६४ कोटींवर पोहोचले. एसआयपी तर १५.३० लाख कोटीची वाढ झाली आहे. एकूण म्युचल फंड आवक (Inflow) जून महिन्यात महिना बेसिसवर ६७% वाढले आहे ज्याचे मूल्यांकन मे महिन्यातील २९५७२ कोटींवरून ४९३०१ कोटीवर पोहोचले आहे. एकूण व्यवस्थापनांअंतर्गत मालमत्ता (Asset Under Management AUM) हे ३% वाढले आहे. माहितीनुसार मे महिन्यातील ७१.९३ लाख कोटींवरून गुंतवणूकीतील आवक ७४.१४ लाखांवर पोहोचली आहे. जून २०२५ मध्ये गुंतवणूकदारांची सक्रियता चांगली राहिली, जी प्रामुख्याने सक्रिय इक्विटी आणि हायब्रिड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढली. मे २०२५ च्या तुलनेत सक्रिय इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निव्वळ गुंतवणूक २४% ने वाढून २३,५०० कोटींपेक्षा वाढली आहे.


फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये मजबूत सहभागामुळे प्रामुख्याने झाली. ज्यामध्ये ४९% वार्षिक वाढीसह सर्वाधिक गुंतवणूक झाली. माहितीनुसार, लार्ज-कॅप, मिड-कॅप, स्मॉल-कॅप आणि लार्ज आणि मिड-कॅप फंड यासारख्या इतर श्रेणींमध्येही प्रभावी निव्वळ गुंतवणूक नोंदली गेली, जी भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन विश्वासाचे प्रतिबिंब आहे. याशिवाय हायब्रिड फंडांमध्येही जबरदस्त वाढ झाली आहे. ही निव्वळ गुंतवणूक (Net Investment) २३,००० कोटींपेक्षा जास्त सांगण्यात आली आहे.


जाहीर आकडेवारीनुसार, जूनमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक लक्षणीय वाढली, जी मे महिन्यातील  २९२ कोटींवरून सहा पटीने वाढून ₹२,०८०.९ कोटी झाली, म्हणजेच ६१३% वाढ झाली. याउलट, इतर ईटीएफमध्ये मोठी घसरण झाली, गुंतवणूक ७९% घसरून ८४४.४ कोटी झाली. तथापि, हायब्रिड फंडांनी त्यांचा वाढीचा कल कायम ठेवला, जूनमध्ये गुंतवणूक १२% वाढून २३,२२२ कोटी झाली, जी मे महिन्यातील २०,७६५ कोटी होती. न्यू फंड ऑफर्स (F&O) मध्ये जूनमध्ये गुंतवणूक १,९८६ कोटींवर पोहोचली आहे, मे महिन्यातील ४,१७० कोटींवरून ५२% कमी झाली आहे. जी मागील महिन्याच्या आकड्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.


जून २०२५ मध्ये डेट म्युच्युअल फंडाच्या जावकमध्ये (Outflow) १७११ कोटीवर गेला आहे जो मे महिन्यात झालेल्या १५,९०८ कोटी रुपये तुलनेत हा खूपच कमी आहे. कॉर्पोरेट बाँड फंडांत जूनमध्ये  ७,१२४ कोटींची भर पडली आहे.

Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा