वडोदरात गंभीरा पूल अपघातात १० जणांचा मृत्यू, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा !

वडोदरा: गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी ७:३० वाजता महिसागर नदीवरील ४३ वर्षे जुना गंभीरा पूल कोसळला, यात १० जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. हा पूल मध्य गुजरात आणि सौराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता.


या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही मृतांच्या वारसांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये देण्याची घोषणा केली आहे.


वडोदरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाचा १०-१५ मीटर लांबीचा एक स्लॅब कोसळल्यामुळे दोन ट्रक, एक ईको व्हॅन, एक पिकअप व्हॅन आणि एक ऑटोरिक्षा नदीत कोसळली. वडोदरा कलेक्टर अनिल धमेलिया यांनी सांगितले की, बचाव पथकांनी आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढले आहेत आणि ६ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. जखमींना वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र, काही स्थानिकांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, पुलाची दुरवस्था असूनही त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वारंवार दुर्लक्षित केले गेले. यावर गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, १९८५ मध्ये बांधलेल्या या पुलाची वेळोवेळी देखभाल केली जात होती, परंतु दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास केला जाईल. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तातडीने तज्ज्ञांची एक समिती नेमली असून, त्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर