Trump Tarrif : ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, १४ देशांवर लादला ४० टक्क्यांपर्यंत टॅक्स

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्क(टॅरिफ)ची घोषणा केली. सर्वाधिक ४० टक्के टॅरिफ म्यानमार आणि लाओस या देशांवर लावण्यात आला आहे. हे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

ट्रम्प यांनी या नव्या टॅरिफची माहिती आपले सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरून दिली. त्यांनी सांगितले की या निर्णयाशी संबंधिक अधिकाधिक पत्रे संबंधित देशांच्या नेत्यांना पाठवण्यात आली आहेत. ट्रम्प यांनी टॅरिफ पत्रांची लाट असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा १४ देशांना इशारा


ट्रम्प यांनी १४ देशांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रांमध्ये कडक शब्दात इशारा दिला आहे की जर त्यांनी या बदला म्हणून अमेरिकेवरील आयात शुल्क वाढवले तर अमेरिका आणखी तितकेच शुल्क वाढवेल. त्यांनी स्पष्टपणे लिहिले की जर तुम्ही एखाद्या कारणानी टॅरिफ वाढवला तर तुम्ही जितके टक्के वाढवला त्यावर तितकाच अतिरिक्त टॅक्स जोडू.

कोणत्या देशांवर किती टॅक्स


१.म्यानमार- 40%
२. लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक (लाओस)- 40%
३. कंबोडिया- 36%
४. थायलंड- 36%
५. बांगलादेश- 35%
६. सर्बिया- 35%
७. इंडोनेशिया- 32%
८. दक्षिण अफ्रीका- 30%
९. बोस्निया आणि हर्जेगोविना- 30%
१०. जपान- 25%
११. कजाखस्तान- 25%
१२. मलेशिया- 25%
Comments
Add Comment

कोमातील मुलीला शुद्धीवर आणण्यासाठी आईची ‘डान्स थेरपी’

बीजिंग : चीनमधील एका आईने आपल्या कोमात असलेल्या मुलीला १० वर्षे रोज नृत्य करवून चमत्कारिकरीत्या बरे केले आहे.

स्थानिकांच्या रोजगारासाठी ट्रम्प यांचे नवीन ‘एच-१ बी’ व्हिसा धोरण

विधेयक मंजूर झाल्यास ७० टक्के भारतीयांना फटका बसण्याची भीती न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेच्या

पाकिस्तानात ‘सुप्रीम’चे न्यायाधीश लष्करप्रमुखांच्या विरोधात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली

शटडाऊन संपल्याने १४ लाख अमेरिकन लोकांना पगार मिळणार

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी निधी विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे ४३

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,