नवी मुंबई ते कल्याणपर्यंत प्रवास होणार सुस्साट

  52

ठाण्यातील कटाई नाक्याला जोडणारा उन्नत मार्ग बांधणार


मुंबई (प्रतिनिधी): दररोज ठाण्यातील कटाई नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावर प्रवास करणारे वाहनचालक खूप त्रस्त झाले आहेत. आता ही वाहतूक कोंडी सुटणार आहे. कटाई नाक्याला राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा उन्नत रस्ता बांधणाऱ्या एमएमआरडीएने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे वन मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. ६.७१ किमी लांबीचा हा उन्नत मार्ग असणार आहे. हा उन्नत कॉरिडॉर करण्यामागचा उद्देश नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारेल. या ठिकाणी राहणाऱ्यांचा प्रवास सुसाट आणि ट्रैफिक मुक्त होईल. एमएमआरडीएने या उन्नत मार्गासाठी १९८२ कोटी रुपयांच्या किंमतीत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला बांधकामाचे कंत्राट आधीच दिले आहे. सहा पदरी या उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रादेशिक विकासाला लक्षणीय चालना मिळेल अशी आशा आहे.


एमएमआरडीएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन मंजुरीचा प्रस्ताव नुकताच मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील कटाई जंक्शनला एनएच-४ म्हणजे मुंबई-पुणे महामार्ग जोडणारा लिंक रोड बांधण्यासाठी अंदाजे ०.८३२५ हेक्टर खारफुटीची जमीन वळवावी लागेल. एमएमआरडीएने पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या प्रस्तावातअसे म्हटले आहे की, 'गेल्या काही दशकांमध्ये शहराची लोकसंख्या वाढली आहे. सध्याच्या पायाभूत सुविधांवर खूप ताण आहे. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या चौकांमध्ये रस्ते अडवणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. याचा व्यवसाय आणि व्यापारावर अप्रत्यक्ष नकारात्मक परिणाम होतो."


अफकॉन्स सध्या या उन्नत कॉरिडॉरचे डिझाइन आणि बांधकाम करत आहे. ज्यामध्ये ६ किलो मीटरचा व्हायाडक्ट, डीएफसीसीआयएल कॉरिडॉरवर १०० मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज, १.५८ किलो मीटरचा प्रवेश रॅम्प आणि ६.३२ किमीचे सेवा रस्ते यांचा समावेश आहे. या एकात्मिक प्रकल्पामुळे ऐरोली ते कटाई नाकापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारेल. ज्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील वाहतूक सुरळीत होईल.


सध्या प्रवासी अनेकदा महापे मार्गे शिळफाटा येथे पोहोचण्यासाठी आणि नंतर कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि इतर भागात जाण्यासाठी लांब मार्गाचा वापर करतात. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याने प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एनएच-४ ते कटाई नाक्यापर्यंत (कल्याण-शील रोडवरील टोल नाक्याजवळ) बेट उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. हा रस्ता तयार झाल्यानंतर नवी मुंबईत ते कल्याणपर्यंतचा प्रवास सुस्साट होईल.

Comments
Add Comment

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील