'दशावतार' चित्रपटाचा फर्स्ट लूक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला; अमेरिकन कंटेंट क्रिएटर्सकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. आगामी मराठी चित्रपट 'दशावतार' चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध यूटयूब कंटेंट क्रिएटर्स कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी त्यांच्या 'अवर स्टुपिड रिॲक्शन' या लोकप्रिय चॅनलवर 'दशावतार'च्या टीझरला सकारात्मक प्रतिसाद देत भरभरून कौतुक केले आहे.


जगभरातील चित्रपटांचे समीक्षण करणाऱ्या या अमेरिकन क्रिएटर्सनी 'दशावतार'च्या टीझरमधील दृश्यसौंदर्य, भव्य सेट्स, उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स आणि चित्रपटाची संकल्पना पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी या टीझरला 'हॉलीवूड दर्जाच्या पौराणिक चित्रपटासारखा' भासत असल्याचे म्हटले आहे. "मराठी चित्रपट अशा उच्च पातळीवर बनत असल्याचे पाहून खूप आनंद झाला," असेही त्यांनी नमूद केले. सध्या कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांचा हा 'रिॲक्शन' व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे 'दशावतार'ची उत्सुकता केवळ मराठी प्रेक्षकांपुरती मर्यादित न राहता, आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कार्यक्रमात चर्चा झालेला 'दशावतार' हा पहिलाच मराठी आणि बहुधा पहिला भारतीय प्रादेशिक चित्रपट असावा.


 

चित्रपटाबद्दल अधिक माहिती
झी स्टुडिओज् प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित "दशावतार" हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता आणि लोककला यांचे मनोरम्य दर्शन घडवतो. याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान आणि थरारक कथेची जोड देण्यात आली आहे.


या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे असून, कोकणातील एका गूढ कथेवर या चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे.


"दशावतार" हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवत आहे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.

Comments
Add Comment

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या

सुबोध भावे आणि मानसी नाईक जोडी प्रथमच एकत्र

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज