Stock Market Update: सेन्सेक्स व निफ्टीत घसरती सुरूवात ट्रम्प यांच्या कालच्या घोषणेनंतर अस्थिरता कायम !

  50

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात कालप्रमाणेच घसरती सुरूवात झाली आहे. उतरत्या गिफ्ट निफ्टीतील संकेतामुळे आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते असा माहोल बन ला आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या १४ देशांवरील रेसिप्रोकल टेरिफ आकारणीचा घोषणेनंतर आशियाई बाजारात काही प्रमाणात अनपेक्षित तेजी दर्शविली गेली होती तर काल अमेरिकन बाजारात संमिश्र प्रतिसाद राहिला होता. सकाळी सत्र उघडल्यावरच भारतीय बाजारात किरकोळ वाढ झाली ज्यामध्ये सेन्सेक्स निर्देशांक २९.१६ अंकाने वाढला आहे व निफ्टी निर्देशांक १०.१५ अंकाने घसरला आहे. यामुळे बाजारातील अस्थिरता आजही स्पष्ट होत आहे.


सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३२१.२५ अंकांची वाढ झाली असून बँक निफ्टीत १३४.७५ अंकांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने बँकेने फ्लोटिंग दरात प्री पेमेंट आकारणी करण्यास आरबीआयने बंदी घातली तसेच बँकेच्या कामगिरीचा आढावा पाहता व मजबूत फंडामेटल आधारित ही वाढ झाली आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.१२% घसरण झाली तर स्मॉलकॅपमध्ये ०.१३% वाढ झाली आहे. एनएसई मिडकॅप ०.१४% घसरण झाली व स्मॉलकॅपमध्ये ०.०८% वाढ झाली आहे.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज बहुतांश समभागात घसरण झाली आहे आणि अपेक्षितही आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यावर वाढ मेटल (०.२०%), खाजगी बँक (०.७६%), तेल गॅस (०.२४%), एफएमसीजी (०.१२%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.३४%) समभागात वाढ झाली आहे. इतर सगळ्या समभागात (Stocks) घसरण झाली. कंज्युमर ड्युरेबल्स (१.९८%), हेल्थकेअर (०.४७%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.०७%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.०९%), फार्मा (०.६०%), रियल्टी (०.५३%) समभागात सर्वाधिक घसरण झाली.


आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) १.१७% घसरला आहे. त्यामुळे सपोर्ट लेवल राखण्यास अनेक अडथळे जाणवत आहेत. संध्याकाळपर्यंत अमेरिकेकडून काही नवीन स्पष्टीकरण आल्यास त्याचे पडसाद आशियाई बाजारात पडू शकतात. जेन स्ट्रीट प्रकरणानंतर मिडकॅपमध्ये विशेषतः घसरण होत आहे. मात्र बँक निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे आज सकाळी तरी बाजारात सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली आहे.  आशिया-पॅसिफिक प्रदेशात, अनिश्चित सुरुवातीनंतर बाजारांनी संमिश्र कल होता परंतु मोठ्या प्रमाणात सकारात्मक कल दाखवल्याने बाजारात वाढ झाली होती. जपानचा निक्केई निर्देशांक ०.२१% ने वाढला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी (१.१३%) ने मजबूत झाला. दरम्यान, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक (०.१७)% ने वाढला होता. अमेरिकन बाजार काल नकारात्मक पातळीवर बंद झाली होता ज्यामध्ये डाऊ जोन्स (०.०४%), एस अँड पी ५०० (०.७९%), नासडाक (०.९२%) यांचा समावेश आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ अलोक इंडस्ट्रीज (६.४६%), वर्धमान टेक्सटाईल (६.१६%), जेपी पॉवर वेंचर (४.५९%), रेमंड लाईफस्टाईल (३.९६%), ट्रायडंट (३.८६%), कोटक महिंद्रा बँक (३.५९%), जेएम फायनाशिंयल (३.१५%), होनसा कंज्युमर (२.७%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.४८%), एनएचपीसी (२.३२%), इटर्नल (१.८०%), सिमेन्स (१.३७%), डिवीज (१.२६%), इन्फोऐज (१.०३%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (०.९०%), टाटा पॉवर कंपनी (०.८७%), इंडसइंड बँक (०.८०%), पॉवर फायनान्स (०.७२%), जेएसडब्लू एनर्जी (०.६७%), श्रीराम फायनान्स (०.६०%) समभागात वाढ झाली आहे.


सर्वाधिक घसरण टायटन कंपनी (५.०७%), सीजी पॉवर (१.७४%), डॉ रेड्डीज (१.६०%), झायडस लाईफसायन्स (१.५६%), होडांई मोटर्स (१.२१%), लोढा डेव्हलपर (०.९५%), सिप्ला (०.९१%), बजाज होल्डिंग्स (०.८९%), टोरंट फार्मास्युटि कल (०.७३%), ट्रेंट (०.६८%), युनायटेड स्पिरीट (०.६८%), बजाज ऑटो (०.६१%), मदर्सन (०.४५%) समभागात घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या