टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

  59

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे हे इंटरनेट, मोबाईल नेटवर्क, फोन नंबर किंवा ईमेलशिवाय मेसेजिंग करण्याची सुविधा देतं.

जगभरातील युजर्सना सोशल मीडिया, चॅटिंगसाठी सतत इंटरनेटची गरज भासते. पण आता जॅक डोर्सीच्या नवीन प्रोजेक्टमुळे हे समीकरण बदलणार आहे. 'बिटचॅट' हे एक डिसेंट्रलाइज्ड, प्रायव्हसी-केंद्रित मेसेजिंग अ‍ॅप असून ते ब्लूटूथ लो एनर्जी (बीएलई) तंत्रज्ञानावर आधारित आहे.

काय आहे 'बिटचॅट' ?


'बिटचॅट' हे एक पीअर-टू-पीअर चॅटिंग अ‍ॅप आहे. यामध्ये कोणताही केंद्रीय सर्व्हर नसतो. यामुळे सेन्सॉरशिप किंवा इंटरनेट बंदीमुळे अ‍ॅपवर परिणाम होत नाही. मोबाईल नंबर, ईमेल याचीही आवश्यकता नसते, ज्यामुळे प्रयोगकर्त्यांची गोपनीयता अधिक सुरक्षित राहते.

हे अ‍ॅप कसं काम करतं?


ब्लूटूथ मेश नेटवर्क वापरून हे अ‍ॅप जवळच्या डिव्हाइसेसना कनेक्ट करतं.

एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला थेट मेसेज पाठवतो.

मल्टी-हॉप सिस्टमद्वारे लांब अंतरावरील मेसेज दुसऱ्या डिव्हाइसेसद्वारे फॉरवर्ड होतो.

मेसेज रिसिव्हरपर्यंत पोहोचेपर्यंत तात्पुरत्या मेमरीत स्टोअर होतो.

300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर देखील हे नेटवर्क कार्यरत राहतं.

सुरक्षा आणि प्रायव्हसी बाबतीत कितपत विश्वासार्ह?

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन : कर्व्ह 25519 आणि एईएस-जीसीएम अल्गोरिदमचा वापर.

कोणताही फोन नंबर किंवा ईमेलची गरज नाही.

कोणताही सर्व्हर नाही, त्यामुळे अ‍ॅप पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आणि सुरक्षित.

सध्या कुठे उपलब्ध आहे?


'बिटचॅट' सध्या अ‍ॅपल टेस्टफ्लाइट वर आयओएस युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मसाठीही ते लॉन्च करण्यात येईल.

जॅक डोर्सीचा हा 'वीकेंड प्रोजेक्ट' असला तरी, 'बिटचॅट' चं तंत्रज्ञान आणि संकल्पना भविष्यातील इंटरनेट-मुक्त संवादाच्या क्रांतीकडे मोठं पाऊल ठरू शकतं.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या