अकंशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ४ असतो त्यांची कमी वयातच श्रीमंत होण्याची शक्यता अधिक असते. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो.
अंकज्योतिषांच्या मते मूलांक ४ असलेले लोक सुरूवातीपासून मनी मॅनेजमेंटमध्ये हुशार असतात. या लोकांचे जीवन श्रीमंतीत जाते. मूलांक ४चे लोक ज्ञान, मेहनत आणि पूर्ण योजनेने यश मिळवण्यात तरबेज असतात. हे लवकरच आपले लक्ष्य मिळवतात.
मूलांक ४ असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. त्यामुळे हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कोणत्याही पेशामध्ये हे सहज मिसळून जातात. असे मानले जाते की मूलांक ४ असलेले लोक इंजीनियर, वैज्ञानिक, डिझायनर तसेच वकीलसारख्या पेशामध्ये चांगली कामगिरी करतात.