कबुतरखाना बंद करण्यासाठी महापालिका अ‍ॅक्शन मोडवर, दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य सरकारने मुंबईतील ५१ कबुतर खान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सोमवारी जीपीओ समोरील पाणपाईच्या जागेत निर्माण झालेल्या कबुतर खान्यामध्ये कबुतरांना खाण्यास दाणे टाकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला असून ही कारवाई देहाच्या स्वरुपात्त पैसे गोळा करण्यासाठी नसून नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हावो याच दृष्टिकोनातून केल्याचे बोलले जात आहे. मात्र, एकीकडे महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने ही कारवाई केली जात असतानाच दादर कबुतर खान्यामध्ये चक्क कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने याठिकाणचा कबुतरखाना बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही दिसून येत नाही. दरम्यान, उपद्रवशोधकांची पदे रिक्त असल्याने यावर कारवाई कुणी करायची हा मोठा प्रश्न आता महापालिकेपुढे आहे.


कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यास घातक असल्याने मुंबईतील कबुतरांना खाणे देणारी ठिकाण बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मुंबई आणि कबूतर यांची एक वेगळी ओळख आहे आणि मुंबईतील अनेक भागांमध्ये कबुतर खाने आहे. मुंबईत अशाप्रकारे ५१ कबुतर खाने असून सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर तसेच निर्देशानुसार शुक्रवारी महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर कबुतरखान्यावरील छप्पर आणि तेथील साहित्य जप्त केले आणि या कबुतर खान्याची स्वच्छता केली. शुक्रवारी या कचुतर खान्याची स्वच्छता केल्यानंतर शनिवार पासून पुन्हा एकदा पक्षीप्रेमी तथा कबुतर प्रेमी हे भूतदयेपोटी तसेच पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी टाकण्यासाठी दाणे टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे याठिकाणी पुन्हा कबुतर खान्यातील कबुतरांचा बाबर सुरु झाला आहे.


एका बाजुला दादरमधील कबुतर खाना बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाली सुरु नसतानाच दुसरीकडे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्यासमोरील पाणपोईच्या ठिकाणी असलेल्या कबुतरखान्याच्या जागी कबुतरांना दाणे खायला घालण्याविरोधात धडक कारवाई हाती घेतली. या कबुतर खान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य खायला देणान्यांना पाचशे रुपांचा दंड आकारला आहे. याठिकाणी सकाळी बबलू वर्मा यांना दाणे खायला घातल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच प्रत्येक व्यक्तीला दाणे न टाकण्याचे आवाहन केले. त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी चा कबुतरखान्यात दाणे खायला घालू नये असे आवाहनच महापालिकेच्यावतीने केले आहे. दरम्यान, जैन तसेच गुजराती धर्मिय तसेच त्यांच्या संस्थांकडून महापालिकेला निवेदन प्राप्त होत असून या कबुतर खान्पांवर कारवाई न करण्याची विनंती केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने हा निर्णय घेतला असला तरी संस्थांच्या विनंतीनंतर महापालिका काय निर्णय घेते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला