Doctor Suicide: अटल सेतूवरून जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरची खाडीत उडी; शोधकार्य सुरू

नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू पुलावरून जे.जे. रुग्णालयातील एका डॉक्टरने खाडीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून, मंगळवारी (८ जुलै) दुपारपर्यंत संबंधित डॉक्टरचा थांगपत्ता लागलेला नाही. सध्या पोलिसांकडून आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एका प्रत्यक्षदर्शीने डॉक्टरला अटल सेतूवरून खाडीत उडी मारताना पाहिलं आणि तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. पुलावर एक होंडा अमेझ कार आणि एक आयफोन आढळून आला. मोबाईलच्या मदतीने संबंधित व्यक्तीची ओळख पटली असून, त्या डॉक्टरचे नाव डॉ. ओंकार भागवत कवितके (वय ३२) असे आहे.


डॉ. ओंकार कवितके हे मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. रुग्णालयात कार्यरत होते आणि नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात वास्तव्यास होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर गाडी थांबवली आणि खाडीत उडी घेतली.


पोलिसांनी तातडीने बचाव पथक आणि ध्रुवतारा बोट घटनास्थळी बोलावली असून, खाडीत कसून शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचवावी.



आत्महत्येमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात


डॉ. ओंकार कवितके यांनी आत्महत्येचा निर्णय नेमका का घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले जात असून, मानसिक तणाव, व्यक्तिगत अडचणी की अन्य कोणते कारण याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, डॉक्टरसारख्या उच्च शिक्षित व्यक्तीने असा टोकाचा निर्णय घेतल्याने वैद्यकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक