मुंबई : आज महाराष्ट्र विधीमंडळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस जाणून घेऊयात.
१३ कोटी जनतेकडून गवई यांचा सत्कार : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, गवई यांचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर १३ कोटी जनतेकडून आहे. गवई यांना सत्कारासंदर्भात विचारणा केली होती, तेव्हा त्यांनी फक्त सत्कार नको तर संविधानावर मार्गदर्शन ही ठेवा अशी मागणी केली. हा त्यांचा साधेपणा आहे. दादासाहेब गवई हे अजातशत्रू होते, त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भूषण गवई सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला. त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला. मुंबई उच्च न्यायालयात असताना अनेकदा कायदा आणि व्यापक जनहित असताना ही त्यांनी मार्ग काढला होता.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती मात्र गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला. हायकोर्टात असताना ही ते वकिलांच्या बाजूने असायचे. आज ही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना ३/४ मतदान होईल. एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.
खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : खारघर परिसरात ...
देशाला एक अस्सल हिरा मिळालाय : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री अजित एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आजचा दिवस आपल्या सर्वासाठी आनंदाचा आहे. आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलीय. भूषण गवई यांनी १४ मे रोजी शपथ घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले. देशाला एक अस्सल हिरा मिळालाय. एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांच्यात एक शालिनता पहायला मिळाली. सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.
भाषणाची सुरुवात 'माय लॉर्ड' अशी करायला हवी : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या सेंटर हॉलमध्ये अनेक सत्कार झाले, पण आजच्या सत्काराची विधिमंडळामध्ये नोंद होणार आहे. आजच्या भाषणाची सुरुवात 'माय लॉर्ड' अशी करायला हवी होती. लोकशाहीला अधिक बळकट करणारी अशी व्यवस्था आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वात मोठी जबाबदारी ही सरन्यायाधीश यांची असते. ही जबाबदारी आता भूषण गवई सांभाळत आहेत.
अंबादास दानवे यांनी म्हटले की, भूषण गवई यांचा आपण सत्कार करतोय. दोन्ही सभागृहाचा मी एकटाच विरोधी पक्ष नेता आहे . काल परवा कुणी तरी मराठी बद्दल बोललं पण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे भूषण गवई यांनी दाखवून दिले आहे. मराठावाडा आणि विदर्भातली माती काही वेगळी नाही. भूषण गवई आपल्या देशाचे सरन्यायाधीश झालेत. भूषण गवई यांनी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत घेतले. मराठी भाषेत शिक्षण घेतलेला व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच पदावर जाऊ शकतो हे भूषण गवई यांनी दाखवून दिले आहे.