Pratap Sarnaik: "मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी!" प्रताप सरनाईक यांची ठाम भूमिका

  80

मीरा-भाईंदर: मराठी एकीकरण समितीच्या वतीने मिरा रोड येथे आज मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील सहभागी झाले होते. परंतु  उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरनाईक येताच, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देत त्यांना जाणीवपूर्वक यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्याची कल्पना असून देखील सरनाईक यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी विरोधकांचा अपमान सहन करत मोर्चात आपला सहभाग दर्शविला.

मोर्चात येण्यापूर्वी काशिगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेले मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची मंत्री सरनाईक यांनी स्वतः तातडीने सुटका केली. त्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात जाऊन मनसे व एकीकरण समितीच्या इतर कार्यकर्त्यांची ही त्यांनी सुटका केली आणि त्यानंतरच ते मराठी मोर्चात सहभागी झाले होते. काल रात्री उशिरा पोलिसांकडून करण्यात आलेल्या गैरवर्तवणुकीबाबत मंत्री सरनाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन,  मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या अटकेबाबत सविस्तर चर्चा केली.

व्यापाऱ्यांकडून  काढण्यात आलेला मोर्चा जसा शांतप्रकारे पार पडला तसाच आजचा मोर्चा देखील शांतप्रकारे पार पडणार होता. परंतु हा मोर्चा होण्याआधीच पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापले. पोलिसांकडून हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले गेले नसल्याकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांकडून देखील  सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.



 

या संपूर्ण घटनेवर मंत्री सरनाईक यांची स्पष्ट भूमिका 

“जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल, तेव्हा मी पद विसरून मराठी माणसाच्या बाजूने उभा राहीन. मी या मोर्चात कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी सहभागी झालो. माझ्यावर घोषणा करून काहीजण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते, पण मी माझी जबाबदारी पार पाडली. मराठी माणसासाठी, त्याच्या हक्कासाठी आणि शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मी मराठी माणूस म्हणून हि माझी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असण्याचे समजतो. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मात्र, मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर कुणीही अन्याय करू शकत नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. जिथे मनसे-उबाठाचे कार्यकर्ते असतील तिथे माझ्या नावाचे गुणगान गायले जातील अशी अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे. मी मराठी एकीकरण समितीला शब्द दिलं होता कि, मी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मिरा-भाईंदरमध्ये आयोजित मोर्चात सामील होईल आणि तो दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे. जेव्हा - जेव्हा प्रश्न मिरा-भाईंदरमधील मराठी माणसाचा असेल तेव्हा तेव्हा मी मराठी माणूस म्हणून त्यांच्यासोबत उभा राहीन. मी मंत्री, आमदार नंतर... मराठी आधी” अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.
Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत