युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चहलचं नाव आरजे महावशसोबत जोडलं जात आहे. आयपीएलदरम्यान आरजे महावश चहलला चीअर अप करताना दिसली.त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगल्या. याबाबत दोघांनी ऑफिशियल काहीच सांगितलं नाही. मात्र, आता चहलने कपिल शर्माच्या शोमध्ये आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत हिंट दिली आहे.


युजवेंद्र चहलने नुकतीच कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. त्याच्यासोबत गौतम गंभीर, ऋषभ पंत आणि अभिषेक शर्मादेखील होते. या शोमध्ये कलाकारांनी चहलची फिरकी घेतली. अभिनेता किकूने मुलीच्या गेटअपमध्ये येत चहललला विचारले, "तुझ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग का आहे? हे काय चाललंय चहलजी? ती कोण आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे". त्यावर चहल म्हणाला, "आता संपूर्ण देशाला माहीत आहे". चहलच्या या वक्तव्यामुळे तो आरजे महावशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.


दरम्यान, युजवेंद्र चहल त्याच्या खेळीने मैदान गाजवतो. चहलने २०२०मध्ये धनश्री वर्मासोबत लग्न करत संसार थाटला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांची ओळख झाली होती. नंतर काही वेळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते आता वेगळे झाले आहेत.

Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत