NPCI MMRDA: NPCI चे मोठी 'डिल' बीकेसीत MMRDA कडून मोठा भूखंड मिळणार!

प्रतिनिधी: एनपीसीआय (National Payment Corporation of India) यांनी एक मोठा सौदा केला. ज्यामध्ये वित्तीय बाजारातील आश्वासकतेचा चेहरा नव्या उमेदीने समोर आला आहे. एनपीसीआयने वांद्रे कुर्ला संकुल (BKC) येथे १.५ एकरची जागेचे अधिग्रहण एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority MMRDA) यांच्यामार्फत करण्याचे ठरवले आहे. नवीन माहितीनुसार, ८२९.४३ कोटींचा हा सौदा होणार असल्याचे जागतिक बाजारपेठेतील नवे केंद्र यानिमित्ताने मुंबईत स्थापन होईल असा कयास आहे.

१८ जूनला या जागेच्या सौद्यांचा प्रारंभ होऊ शकतो. ही जागा एनपीसीआयला एमएमआरडीए लिजवर देऊ शकते. बीकेसी जी ब्लॉक येथे हा भूखंड आहे. नियामक मंडळाने हा भूखंड प्रस्थापित करण्यासाठी व्यवहाराची अंतिम चर्चा पार पडली. आता हे नवे प्रास्तावित केंद्र एनपीसीआयचे मुख्यालय असणार आहे.

यापूर्वी डिजिटायझेशन करताना देशभरात एनपीसीआयचा वाटा मोठा होता. डिजिटल प्रमाणीकरण एनपीसीआयने केल्यामुळे कँशलेस इकॉनॉमी बनण्यास पाठबळ मिळाले होते. याधर्तीवरच एनपीसीआयने नवीन मुख्यालयात रिसर्च व डेव्हलपमेंट (Research and Development R&D) केंद्र उभारण्याचे ठरवले ज्याचा खर्च मोठ्या संख्येने होऊ शकतो. ५००० सीट क्षमतेचे हे आर अँड डी केंद्र असेल. तर एकूण केंद्राचे क्षेत्रफळ २.५९ लाख स्क्वेअर फूट असणार आहे. याशिवाय पाच लाख स्क्वेअर फूटात १६ मजल्यांची इमारतही अपेक्षित आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एनपीसीआयचाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दिलीप आसबे यांनी म्हटले आहे की,' ५००० सीट क्षमतेचे केंद्र आम्ही नव्या एनपीसीआयचा नव्या मुख्यालयात बांधणार आहोत. गेल्या ५ वर्षात एनपीसीआयला ७० देशांनी भेट दिली आहे.'

बीकेसीतच यापूर्वी ब्रुकफिल्ड कंझोरटियमला १३०२ कोटी किंमतीची जागा प्रदान केली होती. या प्रमुख प्राईम लोकेशनमुळे मोठ्या प्रमाणात सुरळीत कारभार करण्यास एनपीसीआयला सोईस्कर ठरू शकते.गेल्या काही वर्षांत औद्योगिक विशेषतः पीएसयुला मुख्य प्रवाहातील जमीनी खरेदी करण्यास सरकार वाव देत असल्याने त्याचा अंतिमतः फायदा अर्थव्यवस्थेला मिळतो. एनपीसीआयच्या बोर्डाच्या ठरावानुसार, संस्थेची योजना आहे की या जागेवर १६ मजली कार्यालय संस्था बांधेल. प्रस्तावित इमारतीत सुमारे ५,००,००० चौरस फूट बिल्ट-अप स्क्वेअर फूट जागा असण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये धूबेसमेंट पार्किंगसाठी चार ते पाच मजल्यांचा समावेश असेल.

मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, NPCI ने ऑगस्ट २०२४ मध्ये एमएमआरडीएला पत्र लिहून ही जमीन मागितली होती. एनपीसीआयची स्थापना २००८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक्स असोसिएशनने केली होती. ही एक ना-नफा (Non Profit Organisation) संस्था आहे, म्हणजेच तिचा उद्देश नफा कमवणे नाही. एनपीसीआयने UPI, Rupay, IMPS, FASTag, Bharat BillPay आणि Aadhaar Enabled Payment System विकसित केले आहे.
Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड