Ritu Tawade : जन्म मृत्यू प्रमाणपत्र नोंदीमधील अनियमितता प्रकरणी दाखल ५ एफआयआर

पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल ४८ तासांत सादर करावा*


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे निर्देश


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपल्या स्तरावर दुरुस्ती करण्यात आलेले १९ हजार ७३४ जन्म प्रमाणपत्र हे जन्म मृत्यू कायद्यानुसार नसल्याने, त्या जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती रद्द करण्याची तसेच bमूळ प्रमाणपत्र कायम ठेवण्यास परवानगी शासनाने दिली आहे. जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती नोंदी मधील अनियमितता प्रकरणी आतापर्यंत पाच प्रथमदर्शनी अहवाल करण्यात आले आहेत. त्याबाबत पोलीस प्रशासनाने पुढे काय कार्यवाही केली, याचा अहवाल येत्या ४८ तासात सादर करावा, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र आणि त्यातील दुरुस्ती याअनुषंगाने एकूण ८७ हजार ३४७ जन्म प्रमाणपत्रांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. याबाबत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात मंगळवारी १० जून २०२६) बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापौर रितू तावडे यांनी या सूचना दिल्या.


या बैठकीला महापौर रितू तावडे यांच्यासह उपमहापौर संजय घाडी, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक नील सोमय्या, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर तसेच मुंबई पोलीस यांचे प्रतिनिधी म्हणून पोलिस उपायुक्त दत्ता कांबळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.या बैठकीची माहिती देताना महापौर तावडे म्हणाल्या की, महानगरपालिकेने दिलेल्या एकूण ८७ हजार ३४७ जन्म प्रमाणपत्रांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. त्याची पडताळणी आरोग्य विभाग आणि दक्षता विभाग करीत आहे. यातील, १९ हजार ७३४ जन्म प्रमाणपत्रांच्या दुरुस्ती करताना कागदपत्रे नव्हती किंवा अपूर्ण होती. त्या सर्व दुरुस्ती रद्द करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र मूळ प्रमाणपत्र कायम ठेवले आहे. त्याचप्रमाणे आणखी वीस हजार जन्म प्रमाणपत्रांच्या बाबतीत अनियमितता आढळली आहे. त्यातील किरकोळ दुरुस्ती बाबतची कार्यवाही महानगरपालिका आपल्या स्तरावर करणार आहे. तर, मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागितले आहे. त्याबाबतची प्रमाणित कार्यपद्धती (एस ओ पी ) प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.


त्याचप्रमाणे, या अनियमितता प्रकरणी आजवर पाच एफआयआर झाल्या आहेत. त्याबाबत पोलिसांनी पुढे काय कार्यवाही केली, हे कळलेले नाही. त्यामुळे येत्या ४८ तासांत तथा दोन दिवसात पोलिसांनी आपला अहवाल द्यावा, अशी सूचना महापौरांनी केली.दरम्यान, नवीन जन्म प्रमाणपत्र नोंदणी करण्याची कार्यवाही थांबलेली नाही. सीआरएस संकेतस्थळावर जन्म प्रमाणपत्र नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यात कोणताही खंड पडलेला नाही. शासनाकडून एसओपी आल्यावर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती विषयक कार्यवाही केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे