'त्या' निशिकांत दुबेंना समज द्या, अन्यथा.... मंत्री योगेश कदम यांनी घेतला आक्षेप


मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या विधानांवरून आता शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, "मराठी भाषिकांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा आमचे शिवसैनिक त्यांना योग्य ती जागा दाखवतील," असा सज्जड इशारा दिला आहे.



दुबेंनी नेमके काय म्हटले?


काही हिंदी भाषिकांनी 'आम्ही मराठी बोलणार नाही' असे विधान केले होते. त्यानंतर मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर निशिकांत दुबे यांनी थेट महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांवर गरळ ओकली. त्यांनी सुरुवातीला ट्विट करत म्हटले होते की, "हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा."


यावर न थांबता, दुबे यांनी पुढे म्हटले, "हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची सक्ती करणारे कुणाच्या पैशांवर जगत आहेत? टाटा, बिर्ला आणि रिलायन्स हे सर्व हिंदी भाषिक आहेत. सर्व करदाते हे बिहारी, झारखंड आणि उत्तर भारतीय आहेत. आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणताही कर भरत नाहीत. तुमचा कोणताही उद्योग नाही. आमच्या झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडकडे खाणी आहेत. रिलायन्सची रिफायनरीही गुजरातमध्ये आहे. सेमीकंडक्टर कंपन्या गुजरातमध्ये जात आहेत. वरून तुम्ही लाठीमार करता. हिंमत आहे तर हिंदी भाषिकांप्रमाणे उर्दू, तमिळ, तेलुगू भाषिकांनाही मारून दाखवा. तुम्ही तुमच्या घरात मोठे आहात, बॉस आहात तर यूपी, बिहार किंवा तमिळनाडूला या, तुम्हाला आपटून आपटून मारू. आम्ही मराठी भाषेसह, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतो. सर्व मराठी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो. हे राजकारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून केलं जात आहे. त्याचा आम्ही विरोध करतो."


दुबे यांच्या या विधानांवरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री योगेश कदम यांनी निशिकांत दुबे यांना हा शेवटचा इशारा असल्याचे म्हटले आहे. "ते चार टर्म खासदार आहेत, त्यांच्याकडून ही भाषा शोभत नाही," असेही कदम यांनी ठणकावले.


या प्रकरणी भाजपा पक्षश्रेष्ठी आता निशिकांत दुबे यांच्यावर काय कारवाई करतात, आणि या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)