Thackeray Brothers VS BJP : दोन काय चार भाऊ एकत्र आले तरी आम्ही तयार, भाजपच्या प्रसाद लाड यांचं ठाकरे बंधूंना खुले आव्हान

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या गोटातून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लाडके आणि आदरणीय असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायला आणि जाब विचारायला सुरुवात केली होती. यामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) हे आघाडीवर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना (Thackeray Brothers) डिवचत आमनेसामनेच्या लढाईचे आव्हान दिले आहे. प्रसाद लाड आज विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



आम्ही वाटच बघतोय...


प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना ललकारत समोरासमोरच्या लढाईचे आव्हान दिले. आम्ही वाटच बघतोय, दोन भाऊ एकत्र येऊ द्या, होऊ द्या महासंग्राम. दोन भाऊ काय पुतणे, भाचे आणि अजून चार भाऊ हे सगळे एकत्र येऊ द्या, आम्ही तयार आहोत. विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणात फरक होता. उद्धव ठाकरे मराठीबद्दल काय बोलले, सगळं मराठी सोडून 'गद्दा'र, 'धोका', 'खंजीर' हे शब्द त्यांनी भाषणात वापरले, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.



उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत. पण ज्याप्रकारे उद्धव यांनी राज ठाकरे यांचा अपमान केला होता. या सगळ्याबद्दल उद्धव ठाकरे हे राज यांची माफी मागणार का?, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयार आहोत. मराठी भाषेबद्दल सगळ्यांना अभिमान आहे. मराठी भाषेत बोललं पाहिजे, पण एखाद्याला मराठी येत नसेल हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची दादागिरी करून त्याला मारहाण करणं हे योग्य नाही, असे मतही प्रसाद लाड यांनी मांडले. यावर आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात