सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये आता पॅनिक बटण वसवण्याची कार्यवाही सुरू झाली असून, एक नियंत्रण कक्ष मुंबईत उभारला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधान परिषदेत आ. सत्यजित तांबे यांनी यावायत प्रश्न उपस्थित केला, दिल्लीतील निर्भया अत्याचार घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी १ जानेवारी २०११ पासून सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये पनिक बटण अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


राज्य सरकानेही त्याला मान्यता दिली आहे. मात्र, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यात पॅनिक बटणचे कंट्रोल सेंटर उभारलेले नाही, हे खरे आहे का? असा सवाल तांच यांनी केला. त्यावर उत्तर देताना सरनाईक यांनी नियंत्रण कक्षाची उभारणी अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात केली आहे, असे स्पष्ट केले.


२०१९ पूर्वीच्या जुन्या सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्येही पॅनिक बटण बसवणे अनिवार्य असल्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. मात्र, राज्य सरकारने पासंदर्भातील धोरण निश्चित केलेले नाही. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवूनही त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी विचारणाही तबि यांनी केली. सरनाईक यांनी लेखी उत्तरात महटले आहे की, २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्पा वाहनांमध्ये पैनिक बटण बसवण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे.



खात्री करून परवान्याचे नूतनीकरण


२०१९ नंतर नोंदणी केलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहनांत हे बटण चसवणे बंधनकारक आहे. त्यानुसार हे बटण बसविण्यात आले असून, ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची पडताळणी करण्यात येते, सार्वजनिक प्रवासी वाहनांचा परवाना नूतनीकरण, फिटनेस आदी
करतानाही पॅनिक बटण वसविले असल्याची खात्री करूनच परवाना दिला जातो, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ