पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण 


सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शनिवारी सायंकाळी ३ ते ७ एवढा वेळ जनतेसाठी ठेवला होता. यावेळी जनतेची प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी झालेली होती. महावितरण विभागातील कंत्राटी भरती, आरोग्य सेवक, कंत्राटी सफाई कर्मचारी, १०८ टोल फ्री रुग्णवाहिका चालक, निवृत्त शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न घेऊन शिष्टमंडळ भेटले, तर काही खासगी, वैयक्तिक प्रश्न सुद्धा घेऊन नागरिक भेटले. पालकमंत्री नितेश राणे यांनी काही प्रकरणे जागेवरच मार्गी लागली, तर काहींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबाइलद्वारे निर्देश देण्यात आले.


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तसेच इतर विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संपर्क कार्यालयात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये मच्छीमार, वीज वितरण अडचणी, एसटी बस वाहतूक सेवा, शिक्षक भरतीचे प्रश्न हे ठळक होते.


विशेष बाब म्हणजे, याच वेळी सिंधुदुर्गनगरीला नगरपंचायत घोषित करण्याचा मागणीवरही निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे स्थानिक नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. आम्ही जनतेचे सेवक आहोत, प्रशासकीय यंत्रणा ही जनतेसाठी आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केले.




  • अनेक रखडलेली प्रकरणे निकाली

  • शिष्टमंडळाच्या समस्या जागेवरच मार्गी

  • समस्या निवारणासाठी अधिकाऱ्यांना निर्देश

  • नागरी सुविधांमध्ये सुधारणांचे संकेत

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा