कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून रोजी मिलानमधील 'स्प्रिंग/समर मेन्स कलेक्शन 'मध्य सादर केल्यानंतर निर्माण झालेला वाद आता खूप चाढला आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर काही दिवसांनी कंपनीने मौन सोडले असतानाच, कोल्हापुरी चप्पलांच्या कारागीरांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी उच्व न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 'प्राडा'ने मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेल्या 'टो-रिंग' फूटवेअर म्हणजे कोल्हापूर चप्पलांची कोपी आहे. या कंपनीने आपल्या चपला बाजारात आणताना एक निवेदन जाहीर करत त्यात संबंधित उत्पादनामागील प्रेरणा भारतीय कारागिरांकडून घेतल्याचे नमूद केले होते.


या सँडल्सच्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त कोल्हापुरी चपलांशी ठळक साम्य आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये १ लाखाहून अधिक किंमत असलेल्या या सँडलचे प्रदर्शन करण्यात आले. या चप्पलांचे खरे मूळ मान्य न करता त्याचे युरोपियन लेबलखाली पुन्हा अँड करण्यात आले आहे. तसे करून कंपनीने भारतीय कारागीरांच्या आर्थिक व मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले आहे, असे प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे पांच्यासह अन्य वकिलांनी जनहित माचिकेद्वारे न्यायालमाच्या निदर्शनास आणले. कोल्हापुरी चप्पलांशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. ब्रेडने यासंदर्भात दिलेली कबुली ना सार्वजनिक होती ना अधिकृत, ती केवळ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतरच देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी इटालियन लक्झरी बँडने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : पंढरपूर कॉरिडॉरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; "शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही"

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, वारकरी

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी सरकारची जय्यत तयारी! पंढरपूरच्या विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्सपासून CCTV पर्यंत सर्व सुविधा सज्ज

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीत भाविकांना दिलासा; मंदिर समितीकडून अन्नदान, प्रशासनाकडून चोख व्यवस्था

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन

Eknath Shinde :भरपावसात उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद

सोलापूर : आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भरपावसात पंढरपूर येथे

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे