रितेश देशमुख याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. रितेशनं त्याच्या लई भारी चित्रपटातील 'माऊली माऊली' गाण्यातील काही ओळी पोस्ट केल्यात. त्यानं लिहलं, "भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची... उभी पंढरी आज नादावली... तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली... जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली... आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!".
आषाढ महिन्यातील पंढरीची वारी ही खूप जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या, पालख्या येतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे आषाढी एकादशीचे मोठे महत्त्व आहे. वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरुन समतेचा पाया रचला आहे. त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही.