Zerodha Nitin Kamat: जेन स्ट्रीट प्रकरणानंतर झेरोडाचे संस्थापक नितीन कामत यांनी बाजारावर व्यक्त केली 'ही' चिंता !

प्रतिनिधी: जेन स्ट्रीट प्रकरणानंतर बाजारात संशयाचे वातावरण घोघांवत आहे. त्याशिवाय बाजारातील परिस्थिती मजबूत असली तरी बाजारातील अस्थिरतेमुळे यापूर्वीच गुंतवणूकदार विचलित झाला होता. याच पार्श्वभूमीवर झेरोडाचे (Zerodha) संस्थापक नितीन कामत यांनी बाजारावर चिंता व्यक्त केली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांवर (Retail Investors) याचा परिणाम दिसून येऊ शकतो असे विधान केले आहे. कथित प्रकरणात जेन स्ट्रीट अमेरिकन कंपनीने ऑप्शन ट्रेडिंग मध्ये गैरमार्गाने कमाई केली असल्याचे सेबीने म्हटले होते. त्यानंतर सेबीने त्यांच्यावर कारवाईदेखील केली होती. विशेषतः एफ अँड ओ, डेरिएटिव, ऑप्शन ट्रेडिंग या प्रकारच्या व्यवहारावर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात होते.


याविषयी नक्की झेरोडा (Zerodha) संस्थापक नितीन कामत म्हणाले आहेत की, 'जेन स्ट्रीट सारख्या मालकीच्या ट्रेडिंग फर्म्स, ज्या ऑप्शन्स ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये जवळजवळ ५० टक्के वाटा देतात, जर त्यांनी बाजारपेठेतील त्यांचा सहभाग कमी केला तर किरकोळ व्यापार क्रियाकलापांवर परिणाम होऊ शकतो. या विकासाचे एक्सचेंज आणि ब्रोकर दोघांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी पुढे सांगितले. 'जेन स्ट्रीट सारख्या प्रॉप ट्रेडिंग फर्म्स ऑप्शन्स ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये जवळजवळ ५०% वाटा ठेवतात. जर त्यांनी माघार घेतली  जी शक्यता दिसते  तर किरकोळ क्रियाकलाप (~३५%) देखील प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे एक्सचेंज आणि ब्रोकर दोघांसाठीही ही वाईट बातमी असू शकते असे कामथ यांनी एक्सवर सांगितले आहे.


सेबीच्या अंतरिम माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान, जेन स्ट्रीटने डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये ३६,००० कोटींपेक्षा जास्त नफा कमावला आहे. अशा परिस्थितीत बाजारातील दबाव कायम राहताना गुंतवणूक दारांचा काही प्रवाह बाजाराचा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सेबीच्या अंतरिम आदेशानुसार, गेल्या दोन वर्षांत जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान, जेन स्ट्रीटने डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये ३६,००० कोटींपेक्षा जास्त नफा कमावला आहे.


'अमेरिकन बाजारपेठांच्या रचनेचा विचार करा: अंधारकोठडी, ऑर्डर फ्लोसाठी पेमेंट आणि इतर त्रुटी ज्यामुळे हेज फंड किरकोळ गुंतवणूकदारांना अब्जावधी कमाई करू शकतात. आमच्या नियामकांमुळे (Regulators) भारतात यापैकी कोणत्याही पद्धतीं ना परवानगी दिली जाणार नाही' असेही कामत एक्सवर व्यक्त करताना म्हटले आहे. या प्रकरणाचा फटका बाजारातील सूचीबद्ध (Listed) समभागात देखील बसला आहे. शुक्रवारी याचा परिणाम भारतातील सूचीबद्ध भां डवली बाजारातील नावांवर दिसून आला आहे. शुक्रवारी नुवामा वेल्थचे शेअर्स १२% खाली आले आहेत, तर बीएसई, एंजल वन आणि सीडीएसएलचे शेअर्स अनुक्रमे ६%, ६% आणि २.५% खाली आले आहेत.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७