खाणीत सकाळी मोठा आवाज आला. आवाजाच्या दिशेने बघितल्यावर खाणीचा मोठा भाग कोसळल्याचे लक्षात आले. यानंतर तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. लगेच मदतकार्य सुरू झाले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण खाणीत बेकायदेशिररित्या खोदकाम करत होते. यावेळी खबरदारी घेतली नाही. त्यामुळे खाणीचा एक भाग कोसळून दुर्घटना घडली आहे.
खाणीतील दुर्घटनेची चौकशी होणार असल्याची माहिती रामगड जिल्हा प्रशासनाने दिली.