मुंबई: स्कोडा ऑटोने भारतातील अत्याधुनिक उत्पादन सुविधाअंतर्गत ५ लाख कारची निर्मिती करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन ग्रुप (SAFG)चे भारताप्रती असलेले वचनबद्धतेचे दर्शन या यशातून होते असे कंपनीने यादरम्यान म्हटले आहे. भारतीयांची कारागिरी आणि स्थानिकीकरणावरील त्यांचा विश्वासही यातून दिसून येतो. या व्यवहारात जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि सुरक्षेवर भर देण्यात आला आहे.
२००१ मध्ये स्कोडाने छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील त्यांच्या प्रकल्पातून पहिली ऑक्टेव्हिया बाजारात आणली. तेव्हापासून या ब्रँडचा भारतातील विस्तार वाढत गेला. तसेच त्यांच्या उत्पादनातही विविधता आली. ऑक्टेव्हिया, लॉरा, सुपर्ब आणि कोडियाकसारख्या प्रतिष्ठित गाड्यांपासून ते कुशाक, स्लाव्हिया आणि पहिली सब-४-मीटर किलाक यासारख्या नव्या जमान्यातील लोकप्रिय गाड्यांपर्यंत ही प्रगती आहे. स्कोडाने केवळ गाड्याच नव्हे तर भारतीय वाहन प्रेमींशी एक पक्के भावनिक नाते जोडले आहे. बदलत्या काळातील आवडीनिवडीनुसार गाड्या उपलब्ध करून देत हे नाते अधिक मजबूत केले आहे असे कंपनीने लाँच दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
भारतात उत्पादन झालेल्या कार केवळ देशांतर्गत वापरासाठी नाहीत. स्कोडा ऑटोच्या जागतिक ध्येयांना आता भारतातील उत्पादन क्षमतांची मदत मिळत आहे. कारण ग्रुपच्या नुकत्याच सुरु झालेल्या व्हिएतनाममधील उत्पादन प्रकल्पात भारतात उत्पादित झालेले सुटे भाग जोडले जात आहेत. या सुविधेच्या माध्यमातून व्हिएतनाम करिता कुशाक आणि स्लाव्हिया कारचे स्थानिक पातळीवर उत्पादन केले जाईल. यामुळे स्कोडाच्या जागतिक विस्तारात भारत एक धोरणात्मक निर्यात केंद्र अशा मजबूत भूमिकेत असेल. भारत सरकारच्या मेक इन इंडिया अर्थात ‘भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादन’ या महत्त्वाकांक्षेशी हे सुसंगत आहे.
स्कोडा ऑटो उत्पादन आणि लॉजिस्टिक्स ए.एस. बोर्ड सदस्य, आंद्रे डिक म्हणाले, “भारतात ५ लाख कार निर्मिती करण्याचा टप्पा गाठणे हे भारताप्रती असलेल्या आमच्या अतूट वचनबद्धतेचे आणि उत्कृष्ट कार्यान्वयन असण्याच्या आमच्या धोरणात्मक दूरदृष्टीचे अभिमानास्पद प्रतीक आहे. स्थानिक अभियांत्रिकी कौशल्याला प्रोत्साहन देत आणि जागतिक उत्पादन प्रक्रियेच्या मदतीने आम्ही एक अशी इकोसिस्टिम तयार केली आहे, जी वेगवान, विस्तारण्यासाठी सज्ज आणि वेगाने बदलणाऱ्या वातावरणाशी समरस होणारी आहे. तसेच ती सर्वोच्च आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणारी आहे. या यशातून जागतिक दर्जाची नवनिर्मिती तसेच भारताचे वाढते औद्योगिक सामर्थ्य यांचा मिलाप दिसून येतो.'
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे सीई आणि व्यवस्थापकीय संचालक पियूष अरोरा म्हणाले, 'हे यश केवळ ५ लाख कार निर्मितीपुरतेच मर्यादित नाही, तर यातून ५ लाख नाती निर्माण झाली असून ती जपली जात आहेत. आमच्या उत्पादन प्रकल्पातून बाहेर पडणारी प्रत्येक कार अतुलनीय दर्जासह युरोपियन अभियांत्रिकीचे डीएनए धारण केलेली असते. ती अत्यंत सटिक तयार केलेली असून उत्कृष्ट दर्जाची आराम सुविधा, सुरक्षितता, तंत्रज्ञान आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सची सुविधा यातून मिळते. हे यश आमच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच ग्राहकांचेदेखील आहे. कारण यातून केवळ मोबिलिटी तयार केली जात नाही तर भारत हा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी काय निर्माण करू शकतो, यासंबंधीचा वि श्वास आम्ही तयार करत आहोत. आमच्या समूहाच्या विस्तारात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. '
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्कोडाने भारतातील दोन प्रमुख निर्मिती प्रकल्पांची क्षमता एकत्र करून ५ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी अंदाजे ७० टक्के वाहने पुण्यातील प्रकल्पात तयार करण्यात आली आहेत. तर उर्वरीत वाहने छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पात तयार झाली. स्कोडा ब्रँडने मार्च २०२५ मध्ये सर्वाधिक मासिक विक्रीची नोंद केली. तर एकाच महिन्यात७४२२ युनिट वितरीत केले आहेत.