काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पण निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणे टाळले. या प्रकरणात चौकशी सुरू झाली आणि राहुल गांधींच्या काही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आढळले. तर काही ठिकाणी जिथे काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला होता तिथेच बोगस मतदार नोंदणी झाली असल्याचे तसेच काही मतदारांची नावं वगळण्यात आल्याचे आढळले. यानंतर लवकरच होणार असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मतदारयादीची सखोल छाननी अर्थात एसआयआर (Special Intensive Revision - SIR) सुरू केली. या प्रक्रियेला काँग्रेसने कडाडून विरोध केला. काँग्रेसचे हे अनाकलनीय वर्तन अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जात आहेत, असा नवा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अ व्यक्ती जीवंत नाही अशी तक्रार ब व्यक्तीच्या नावे क व्यक्ती करते. ही क व्यक्ती कोणाला दिसत नाही की माहिती नाही. पण या तक्रारींची दखल घेऊन नावं गायब केली जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अ आणि ब व्यक्तींना मंचावर येऊन बोलायला परवानगी दिली. पण क व्यक्तीबाबत कोणाताही ठोस साक्षी - पुरावा अद्याप निवडणूक आयोगाला सादर केलेला नाही. यामुळे आधीच्या आरोपांसारखेच नवे आरोप बिनबुडाचे ठरणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माझं देशावर, संविधानावर आणि लोकशाहीवर प्रेम आहे; असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस समर्थक मतदारांचीच नावं मतदारयादीतून गायब केली जात असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे. याच कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातून सहा हजार १८ मतं गायब करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. नावं गायब करण्याचं काम एक वेगळी शक्ती करत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा दावा करताना त्या शक्तीबाबतचा ठोस पुरावा सादर करणे टाळले.
Comments
Add Comment

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा