जसलोक हॉस्पिटलने टर्मिनल प्रोस्टेट कर्करोगाने पीडित रूग्‍णाचे प्राण वाचवले

  45

७००० पेक्षा कमी प्‍लेटलेट असलेल्‍या रुग्णावर ल्‍युटेशियम थेरपी करत रचला इतिहास 

मुंबई: प्रगत कर्करोग उपचारांमध्ये न्‍यूक्लिअर मेडिसीनच्‍या भूमिकेला चालना देणाऱ्या या अद्वितीय केसमध्‍ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने प्रगत मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोगाने पीडित ६६ वर्षीय विनय वैद्य यांच्यावर यशस्वी उपचार केले आहेत, जेथे या उपचारामधून वैद्य यांना आशेचा नवीन किरण मिळाला. समकालीन उपचार अयशस्वी झाले आणि त्याला जगण्यासाठी फक्‍त काही महिने उरले असल्‍याचे सांगण्‍यात आले, तेव्हा जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ल्यु टेशियम थेरपीचा उपयोग करत त्यांना जीवनदान दिले.

अनेक हार्मोनल थेरपी आणि किमान तीन केमोथेरपी हा आजार प्रगत होण्‍याला प्रतिबंध करण्‍यामध्‍ये अयशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. त्याचा कर्करोग रक्‍तपेशी निर्माण करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण घटक बोन मॅरोमध्‍ये (अस्थि मज्जा) मोठ्या प्रमाणात पसरला होता, ज्यामुळे हिमोग्लोबिन आणि प्लेटलेटची पातळी धोकादायकपणे कमी झाली होती. यामुळे त्याला वारंवार रक्‍तसंक्रमण करावे लागत होते आणि सहाय्यक व उपशामक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला, पण जगण्‍याची शक्‍यता खूप कमी होती. जगण्‍याची आशा कायम ठेवत वैद्य यांनी जसलोक हॉस्पिटलशी संपर्क साधला. हॉस्पिटलमधील डॉ. जेहान धाभार आणि डॉ. विक्रम लेले यांच्या तज्ञ देखरेखीखाली टीमने या गुंतागूंतीच्या केसवर उपचार सुरू केले. रुग्णाची प्लेटलेट संख्या ७,००० इतकी कमी होती, जी बहुतेक केंद्रांवर ल्युटेशियम थेरपीसाठी स्वीकारल्या जाणाऱ्या मर्यादेपेक्षा खूपच कमी होती. असे असताना देखील टीमने अधिक काळजी घेत आणि रक्‍त घटक संक्रम णाद्वारे त्याची प्रकृती सुधारली.

५०,००० पेक्षा कमी प्लेटलेट संख्‍या असलेल्या रुग्णांवर सहसा ल्युटेशियम थेरपी केली जात नाही,' असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी डॉ. जेहान धाभार म्‍हणाले.“इतक्या कमी प्‍लेटलेट संख्‍या अस लेल्या रुग्णावर उपचार करणे अभूतपूर्व होते आणि त्यात काळजीपूर्वक जोखीम मूल्यांकन व नियोजन करणे आवश्यक होते. आम्ही रुग्णाला स्पष्‍टपणे सांगितले की हा एक नवीन दृष्टिकोन आहे, तरीही उपचार यशस्‍वी होण्‍याची शक्‍यता आहे.''

'या केसमधून वैयक्तिक काळजी आणि नाविन्‍यतेची ताकद दिसून येते,असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्‍या न्‍यूक्लिअर मेडिसीन डिपार्टमेंटचे संचालक डॉ. विक्रम लेले म्‍हणाले. 'समकालीन उपचार प्रोटोकॉल्‍सच्‍या मर्यादांना दूर करत आणि रूग्‍णाच्‍या अद्वितीय स्थितीनुसार थेरपी तयार करत आम्‍ही पूर्वी उपचार न होऊ शकलेल्‍या रूग्‍णांसाठी नवीन मार्ग खुले केले आहेत. या केसमधून आधुनिक ऑन्‍कोलॉजीमध्‍ये बहुआयामी सहयोग आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञान साध्‍य करू शकणारे यश दिसून येते.'

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खडके म्हणाले, 'हे फक्‍त वैद्यकीय आव्हान नव्हते तर विश्‍वास, अभिनवता आणि दृढनिश्चयाची परीक्षा होती. इतर सर्व पर्याय संपले असताना आणि प्रगत उपचारांसाठी त्‍याची प्रकृती खूपच गंभीर मानली जात असताना रुग्ण आमच्याकडे आला. जोखीम असूनही आमच्या टीमने त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि शक्य तितकी सर्वोत्तम काळजी देण्याचा निर्णय घेतला. यासारख्‍या केसमधून जसलोकमधील आमची क्षमता दिसून येते, जेथे आशेचा किरण जागृत करण्‍यासह उत्तम कौशल्‍यापूर्ण उपचार केले जातात, तसेच बरे होण्‍याची थोडीशीही आशा असल्‍यास रूग्‍णावर सर्वोत्तम उपचार केले जातात.'

रुग्णावर आता दोन यशस्वी ल्युटेशियम थेरपी करण्‍यात आली आहे. कर्करोगासाठी प्रमुख मार्कर असलेले प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटीजेन (पीएसए) शंभरहून कमी होऊन १ पेक्षा कमी झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याला आता प्लेटलेट रक्‍तसंक्रमणाची आवश्यकता नाही, शेवटचे रक्‍तसंक्रमण एक महिन्यापूर्वी झाले होते आणि त्याने त्याचे दैनंदिन क्रियाकलाप व काम पुन्हा सुरू केले आहे. कृतज्ञता व्‍यक्‍त करत विनय वैद्य म्‍हणाले, 'वर्षानुवर्षे मला खूप वेदना होत होत्‍या आणि अनेक उपचार केले जसे की २० केमोथेरपी सायकल्स, पण क्वचितच आराम मिळाला. अनेकांनी माझ्या जगण्‍याच्‍या बाबतीत आशा सोडली होती, पण मला सर्वात जास्त गरज होती तेव्हा जसलोक हॉस्पिटलने आशेचा किरण दाखवला. डॉ धाभार, डॉ. लेले आणि संपूर्ण टीम यांनी घेतलेली काळजी, समर्पण आणि कौशल्याने माझे जीवन खरोखरंच बदलून टाकले आहे. आज, मी माझे दैनंदिन जी वन नवीन आत्मविश्‍वास आणि आशेने जगत आहे.'
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांना 'एक टक्के' नोंदणी निधी थेट हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव!

प्रक्रिया अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, महसूलमंत्र्यांची विधानसभेत

बोरिवली येथील खादी ग्रामोद्योग ट्रस्टला जमीन हस्तांतरण कायदेशीर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत स्पष्टीकरण मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी

अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेसाठी सज्ज होईल

मुंबई : राज्यातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. अंधेरी येथील

JIOचा सगळ्यात स्वस्त प्लान, यात मिळणार दररोज २ जीबी डेटा आणि बरंच काही...

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स असतात. कंपनी स्वस्त तसेच महाग अनेक ऑफर करत असते. १९८

Violation Of Rights : हक्कभंगातून सुटका नाही! सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे

Devendra Fadnavis : 'मराठीच्या नावाखाली गुंडगिरी केली तर सहन करणार नाही'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसेला कडक इशारा मुंबई : राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या