Eknath Shinde: 'जय गुजरात...'; पुण्यातील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंची शहांसमोर घोषणा

  40

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'जय महाराष्ट्र' नंतर 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात आज (दि.४) हा प्रसंग घडला.

मराठी आणि हिंदीवरून वाद सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण केले. यावेळी भाषण संपतानाच शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र असे म्हंटले आणि तेथून जाणार तेवढ्यात खाली वाचून त्यांनी पुढे जय गुजरात असा नारा दिला. यावरून आता वाद सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजराती समाजाकडून पुण्यातील कोंढवा भागात हे सेंटर उभारण्यात आले आहे. शिंदे यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत हा नारा दिला आहे.

 
Comments
Add Comment

पुणे लैंगिक छळ: मोठा खुलासा , तक्रार खोटी!

पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीचा लैंगिक छळ केल्याची

पनवेल महानगरपालिका हद्दीतील एक ते अकरा गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासास सिडको सकारात्मक

मुंबई : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर एक ते अकरा क्रमांकाच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत

'थोरल्या बाजीरावांनी २० वर्षात ४१ लढाया जिंकल्या'

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांनी २० वर्षांत ४१ लढाया लढल्या आणि जिंकल्या. अपराजित राहिलेल्या थोरल्या बाजीराव

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ: महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवे आरोप, पोलीस चौकशी सुरू

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. बीड पोलिसांनी महादेव

'३ ऑक्टोबर' हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' व 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' प्रतिवर्षी साजरा करणार

मराठी-हिंदी वाद सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय झाला जाहीर मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने पाच जणांना चिरडले; २ ठार, ४ जखमी

छत्रपती संभाजीनगर: आज सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात एक भीषण अपघात घडला. सिडको एन-१ परिसरातील काळा गणपती