शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण पालिकेनेही पीओपी गणेशमूर्तीबाबत कडक धोरण स्वीकारले होते. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी शाडूच्या मुतींना चांगली मागणी आहे, अशी माहिती येथील मूर्तिकार देत आहेत. गणरायांच्या आगमनाला दीड महिना राहिला असून, गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे.


मागील काही वर्षांत पीओपीच्या मूर्तीना पर्याय म्हणून शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सर्व स्तरांतून सुरू आहे. गणरायांच्या आगमनाला अवघा महिना राहिला असून, गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे भक्तांची पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती, कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीकडे भक्तांचा ओढा वाढला आहे.


आम्ही शाडू मातीच्या मूती तयार करत आहोत. सरकारने शाडू मातीच्या मूर्तीना प्रोत्साहन दिल्यास कामगारांना रोजगार मिळेल तसेच पारंपरिक सुरू असलेले कारखाने टिकतील, आम्ही पारंपरिक पद्धतीने गणपतीची षोडशोपचारे पूजा करण्यासाठी ताम्हणातील हाताने बनवलेला सुबक गणपती बनवतो. ताम्हणाच्या आकाराचा पाट करून त्यावर कमळात बसलेली गणेशमूर्ती हे आमचे पेटंट बनले आहे. १ हजारपासून १० रुपयापर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. - राजन लवेकर, मूर्तिकार, कापसाळ

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर