संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.Curzon Films आणि Purushottam Studios एकत्र येऊन बनवलेला, ‘संत तुकाराम’ हा बहुप्रतिक्षित आणि भव्य चित्रपट लवकरच सर्व भारतात प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीझर लाँच केल्यानंतर,आता चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात झाली. मुख्य कलाकार सुबोध भावे, शिवा सूर्यवंशी आणि शिना चोहन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि चित्रपटाबद्दल संवाद साधला.

चित्रपट ‘संत तुकाराम’ हा १७व्या शतकातील संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी भक्तीला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले.पुण्याच्या संवादाआधी अभिनेत्री शिना चोहन यांनी देहू येथील संत तुकाराम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले.दिग्दर्शक आदित्य ओम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या टीझरच सादरीकरण अतिशय प्रभावी आहे. हा टिझर तुकाराम महाराजांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक प्रवासाची झलक दाखवतो.एक दुःखाने ग्रस्त पती ते समाजासाठी आवाज बनलेला संत असा संत तुकाराम महाराजांचा प्रवास या चित्रपटात उलगडला जाणार आहे.

या चित्रपटात संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रुपाली जाधव, DJ अकबर सामी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.मुख्य कथाकथन ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या आवाजात असणार आहे. हा आवाज चित्रपटात आध्यात्मिकता आणि गंभीरपणा आणेल. संगीतकार निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांच संगीत चित्रपटाला लाभलं आहे. हे संगीत अभंग आणि पारंपरिक संगीतावर आधारित आहे.हा चित्रपट तुकारामांच्या भावनिक प्रवासाला अधिक प्रभावीपणे उलगडणारा आहे.हा चित्रपट सर्व भारतीय प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला असून. त्याच कथानक, संगीत आणि अभिनय सर्व धर्म, भाषा आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांना सामावून घेणार आहे.
Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर