चित्रपट ‘संत तुकाराम’ हा १७व्या शतकातील संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी भक्तीला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले.पुण्याच्या संवादाआधी अभिनेत्री शिना चोहन यांनी देहू येथील संत तुकाराम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले.दिग्दर्शक आदित्य ओम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या टीझरच सादरीकरण अतिशय प्रभावी आहे. हा टिझर तुकाराम महाराजांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक प्रवासाची झलक दाखवतो.एक दुःखाने ग्रस्त पती ते समाजासाठी आवाज बनलेला संत असा संत तुकाराम महाराजांचा प्रवास या चित्रपटात उलगडला जाणार आहे.
या चित्रपटात संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रुपाली जाधव, DJ अकबर सामी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत.मुख्य कथाकथन ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या आवाजात असणार आहे. हा आवाज चित्रपटात आध्यात्मिकता आणि गंभीरपणा आणेल. संगीतकार निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांच संगीत चित्रपटाला लाभलं आहे. हे संगीत अभंग आणि पारंपरिक संगीतावर आधारित आहे.हा चित्रपट तुकारामांच्या भावनिक प्रवासाला अधिक प्रभावीपणे उलगडणारा आहे.हा चित्रपट सर्व भारतीय प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला असून. त्याच कथानक, संगीत आणि अभिनय सर्व धर्म, भाषा आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांना सामावून घेणार आहे.