Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. याविषयी भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘पिक्चर अभी बाकी हैं, अस म्हणत टोला लगावलाय.



'पिक्चर अजून बाकी आहे'


“कोर्टात चालू असलेला मॅटर आहे. त्याबद्दल किती भाष्य करु शकतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. हा नितेश राणेंचा विषय नाही. राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियानचे वडील ज्यांनी स्वतची मुलगी गमावली ते राजकीय आरोप करणार आहेत का? ते मुद्दामून कोणाचं नाव घेणार का? त्यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं, दिशा सालियानच्या वडिलांनी डिनो मारियो, आदित्य ठाकरे यांची नाव घेतली आहेत. म्हणून मी एवढच सांगेन पिक्चर अजून बाकी आहे. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. १६ तारीख दिली आहे. त्या तारखेला काय होत ते आपण बघू” असं नितेश राणे म्हणाले.


?si=aB6_PbTXPfXPIQpl

“राज्य सरकार, आत्ताचे पोलीस त्यांना जे नजरेसमोर दिसलं त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल एसआयटी गठीत झाली. त्यात एक अधिकारी होता, तो दिशा सालियान केसमध्ये साथीदार होता. त्याला बदलण्यात यावं, असं पत्र मी दिलेलं. दिशा सालियानच्या वडिलांनी कोर्टात काऊंटर प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. १६ तारखेला काय होतं ते पाहू. पिक्चर अजून बाकी आहे” असं नितेश राणे यांनी म्हंटलंय.



‘आगे, आगे देखो होता हैं क्या’


आदित्य ठाकरे म्हणतात माझा या प्रकरणाशी संबंध नाही. नाहक बदनामी सुरु आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “यावर आता उत्तर देण्यापेक्षा आगे, आगे देखो होता हैं क्या, तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन ठेवा. नंतर एकत्र वाजवायला मिळतील”



आदित्य ठाकरेंची माहिती खोटी


दरम्यान, कोर्टात आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली, मी आमदार आहे हे लपवून त्यांनी आपण व्यवसाय करत असल्याचं दाखवलं. दिशा सालियानला नक्की न्याय दिला जाणार हे सर्व आरोपी तुरुंगात जाणार, असेही नितेश राणेंनी म्हटलंय.


Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट