आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

  94

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेत तब्बल १४ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायाची शिस्त आणि पावित्र्य राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पथकांनी अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, वाहतूक आणि बेकायदेशीर धाब्यांवर लक्ष केंद्रित केले होते. विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.



नेमके काय जप्त झाले?


या कारवाईत एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ९५५० लिटर रसायन, २३५ लिटर हातभट्टी दारू, १९४.२२ लिटर देशी मद्य, ३०.२४ लिटर विदेशी मद्य, ७८ लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १४ लाख ४५ हजार ४०० रुपये इतकी आहे.



गेल्या एका महिन्यात २२९ गुन्हे दाखल!


केवळ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरच नाही, तर १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीतही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने कारवाई केली आहे. या एका महिन्यात एकूण २२९ गुन्हे नोंदवून २१४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


या मोठ्या मोहिमेत ६५,५५० लिटर रसायन, ५७९३ लिटर हातभट्टी दारू, ४९९ लिटर देशी मद्य, १२८ लिटर विदेशी मद्य, १०२.३२ लिटर बिअर, २४६७ लिटर ताडी, १२६० लिटर गोव्यातील बनावट विदेशी मद्य आणि २७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या सर्व जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३ लाख ३७ हजार २३८ रुपये इतकी आहे.


याशिवाय, अवैध मद्यविक्री आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या २७ धाब्यांवरही गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.


अवैध मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतुकीविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली आहे. तुम्हाला कुठेही अवैध मद्याची माहिती मिळाल्यास, टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधून माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय