केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

  59

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी जम्मू-काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते काही उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील तसेच शेती ग्रामीण विकास आणि शिक्षणाशी संबंधित काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.


शिवराज सिंह चौहान 3 जुलै रोजी सकाळी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे तसेच ग्रामीण विकास विभागाने श्रीनगरच्या सचिवालयात आयोजित केलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. दुपारी ते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सल्लागार समितीने नैसर्गिक शेती तसेच राष्ट्रीय तेलबिया योजना या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहतील. त्याच दिवशी संध्याकाळी ते जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या सन्मानार्थ राजभवनात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहतील.


दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान शेर-ए-काश्मीर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा समारंभ श्रीनगरमध्ये विद्यापीठाच्या शालिमार पदवीदान केंद्रामध्ये होईल. या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू मनोज सिन्हा तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि शेर-ए-काश्मीर विद्यापीठआचे प्र-कुलगुरू ओमर अब्दुल्ला हे सुद्धा उपस्थित राहतील.


पदवीदान समारंभात 5,250 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी पदव्या प्रदान करण्यात येतील. याशिवाय 150 सुवर्णपदके आणि 445 गुणवत्ता प्रमाणपत्र विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतील.


पदवीदान समारंभानंतर शिवराज सिंह चौहान विद्यापीठाच्या परिसरातील केशर आणि सफरचंदाच्या बागांना भेट देतील आणि उद्यान कृषी विद्या शास्त्रज्ञांबरोबर तसेच शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतील. यानंतर ते खोनमोह गावातील लखपती दीदींची भेट घेतील.

Comments
Add Comment

एलविश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला एन्काउंटरनंतर अटक

फरीदाबाद: यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी २' विजेता एलविश यादवच्या गुरुग्राममधील

रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त सामानासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमध्ये आता विमानसेवेप्रमाणे अतिरिक्त सामान घेऊन जाण्यासाठी शुल्क आकारले जाईल, अशा

अभिनेता विजय राजकीय रणांगणात! स्वबळावर आगामी निवडणूक लढण्याची केली घोषणा

चेन्नई: अभिनेता विजय यांनी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षासोबत

मॉस्कोमध्ये जयशंकर यांनी घेतली पुतीन यांची भेट, म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर भारत-रशिया संबंध स्थिर

मॉस्को: भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून, त्यांनी गुरुवारी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

लोकसभेत १२ तर राज्यसभेत १५ विधेयके मंजूर महिनाभरात फक्त ३७ तास चर्चा नवी दिल्ली : महिनाभर चाललेल्या अधिवेशनात

J&K Accident : वैष्णोदेवी यात्रेला निघालेली बस ३० फूट खोल दरीत कोसळली, एकाच जागीच मृत्यू अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. सांबा जिल्ह्यातील जटवाल