Stock Market Update: सेन्सेक्स व निफ्टीत किरकोळ वाढ बाजारात तेजी व निर्देशांक Flat? 'या सेक्टर' वर फोकस आवश्यक.....

  28

मोहित सोमण: सकाळी बाजार उघडल्यावरच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. कालचा तेजीचा अंडरकरंट कायम राहिल्याने उघडताच बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स ६६ अंकांने व निफ्टी ९.८५ अंकांने वधारला होता. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ७५.०६ अंकांची तर बँक निफ्टीत १७२.१५ अंकांनी घसरण झाली आहे. बाजारात किरकोळ तेजी असली तरी तांत्रिकदृष्ट्या बाजार सुरूवातीला 'सपाट' (Flat) राहिला आहे. खरं तर सकाळीच गिफ्ट निफ्टीत वाढ झाल्यानंतर बाजारात सकारात्मक संकेत मिळत होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र परिस्थिती काल भारतीय बाजारात अखेरच्या सत्रात परावर्तित झाली असली तरी आज फोकस गुंतवणूकदारांचा तिमाही निकालांवर (Q3 Results) असणार आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या टेरिफसाठी सकारात्मक संकेतानंतर भारतीय बाजारात आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांंचे लक्ष आता भारत-अमेरिका व्यापार करारावर आहे जो अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२२%,०.३५% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१७%,०.३८% घसरण झाली. अजूनही वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (Indian Volatility Index VIX) मध्ये अपेक्षित वाढ झालेली नसल्याने क्षेत्रीय विशेष समभागातील फंडामेंटल नकारात्मकता शोषून घेत आहे. व शेषतः आज बँक,फायनांशियल सर्विसेस क्षेत्रातील समभागात मोठी हालचाल अपेक्षित आहे. याशिवाय मान्सूनमुळे ट्रॅक्टर मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने त्या समभागांकडे लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते.ऑटो, फायनांशियल सर्विसेस, कंज्युमर ड्युरेबल्स, आयटी, बँक निर्देशांकात आज फोकस महत्वाचा ठरणार आहे. आज अनेक दिग्गज कंपन्यांच्या तिमाही निकालाचा बाजारात परिणाम होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एशियन पेंट्स, ह्युंदाई मोटर इंडिया, मारुती सुझुकी इंडिया, लुपिन, जेएसडब्ल्यू एनर्जी, गोदरेज प्रॉपर्टीज, नझारा टेक, हिरो मोटोकॉर्प, ट्रायडंट लिमिटेड, व्हीमार्ट रिटेल, आरआयटीईएस हे शेअर्स फोकसमध्ये आहेत.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.८७%), खाजगी बँक (०.१२%), पीएसयु बँक (०.६५%), फायनांशियल सर्विसेस (०.४८%), एफएमसीजी (०.२४%), तेल व गॅस (०.२३%)फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.७५%) समभागात झाली आहे. सर्वाधिक वाढ आयटी (१.४९%), ऑटो (०.११%), फार्मा (०.१३%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.२०%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (०.५६%) समभागात झाली आहे.

अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींनी असेही सांगितले आहे की पुढील आठवड्याच्या अजेंड्यावर व्यापार करार आहेत आणि ९ जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी भारत अमेरिकेसोबत एक करार करण्याच्या जवळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र प्रतिसादात काल अमेरिकन शेअर बाजारात डाऊ जोन्स (०.२४%) मध्ये वाढ झाली होती तर एस अँड पी ५०० (०.११%), नासडाक (NASDAQ ०.८२%) घसरण झाली होती. युरोपियन बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. एफटीएसई (FTSE ०.२८%) बाजारात वाढ झालेली वगळता DAX (१.०%), CAC (०.०४%) घसरण झाली होती.

आशियाई बाजारातील निकेयी २२५ (०.४९%), तैवान वेटेड (०.३४%), कोसपी (KOSPI १.०९%), जकार्ता कंपोझिट (०.८८%), शांघाई कंपोझिट (०.०४%) समभागात घसरण झाली होती तर हेंगसेंग (०.६१%) वाढ झाली आहे .

सकाळच्या सत्रात साई लाईफ (६.४४%), रिटस (Rites ६.२९%), हिताची एनर्जी (३.९१%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (३.४७%), सीपीसीएल (३.२२%),अपोलो टायर्स (३.०९%), जेके टायर्स (३.०९%), झेंनसर टेक्नॉलॉजी (२.३६%), होम फर्स्ट फायनान्स (२.३४%), कजारिया सिरामिक (१.९८%), इन्फोसिस (२.०२%), टीसीएस (१.५२%), विप्रो (१.४६%), टेकमहिंद्रा (१.१७%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.०५%), अंबुजा सिमेंट (०.९३%), हिरो मोटोकॉर्प (०.९१%), जिंदाल स्टील (०.६१%) समभागात वाढ झाली आहे.

सकाळी सर्वाधिक घसरण रेडिंगटन (४.७२%), किर्लोस्कर ब्रदर्स (३.०५%), इंडसइंड बँक (३.०३%), एनबीसीसी (३.०९%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.०४%), एसबीआय कार्ड (२.२७%), सीसीएल प्रोडक्ट (२.२४%), आदित्य बिर्ला कॅपिटल (२.२१%), इंडसइंड बँक (३.१६%), सिमेन्स एनर्जी इंडिया (१.८९%), चोलामंडलम फायनान्स (१.७१%), बँक ऑफ बडोदा (१.५३%), बजाज फिनसर्व्ह (१.४०%), होंडाई मोटर्स इंडिया (१.१९%), कॅनरा बँक (०.७५%), जेएसबब्लू एनर्जी (०.५०%) समभागात झाली आहे.
Comments
Add Comment

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम

परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी

मुंबई : बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात

'एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही'

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर

मुंबई : राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन