'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९ रूपये वाढ झाल्याने प्रति ग्रॅम सोने किंमत ९८८९ रुपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४५ रूपयांनी वाढ झाल्याने प्रति ग्रॅम किंमत पातळी ९०६५ रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७४१७ रुपयांवर पोहोचली आहे. माहितीनुसार, २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ४९० रूपयांनी वाढल्याने दरपातळी ९८८८० रूपयांवर पोहोचली आहे. तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ४५० रूपयांनी वाढत पातळी किंमत ९०६५० रूपयांवर गेली. १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ३७० रूपयांनी घसरत ७४१७० रूपयांवर पोहोचली आहे. आज मुंबई, पुण्यासह बहुतांश प्रमुख शहरातील सराफा बाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८८९ रुपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९०६५ रूपये तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७४८० रुपयांवर स्थिरावले आहेत. पर्यायाने बाजार निर्देशांकातही वाढ झाली.
सोन्याच्या एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) कमोडिटी बाजारातील निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाल्याने दरपातळी ९७२९९ रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१०% वाढ झाली झाल्याने प्रति ग्रॅम किंमत ३३५१ डॉलवर पोहोचली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.०६% वाढ झाली होती.
आजच्या बाजारातील सोन्याच्या दरपातळीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'अमेरिकेतील प्रमुख डेटा रिलीझची बाजारपेठेत वाट पाहत असताना सोन्याचा भाव मर्यादित श्रेणीत होता. कॉमेक्स गोल्ड ३३२७ - ३३४० डॉलरदरम्यान होता, तर एमसीएक्स गोल्ड ९७,००० - ९७,४०० रूपयांदरम्यान होता ज्याच्या किमती ९६,५०० - ९७,८५० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे कारण संभाव्य डॉलर कमकुवत पणा, नॉन-फार्म पेरोल्स (NFP), ADP नॉन-फार्म रोजगार आणि बेरोजगारी आकडेवारीसह सहभागींची किंमत ९६,५०० - ९७,८५० रूपयांच्या विस्तृत श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. ९६.५० च्या जवळ सौम्य ताकद दर्शविणारा डॉलर निर्दे शांक सोन्याच्या किमतीत तीव्र चढउतार रोखत आहे.'
चांदीचे दर ' जैसे थे '
भारतीय बाजारातील चांदीच्या दरात आज कुठलाही बदल झालेला नसल्याने प्रति ग्रॅम किंमत ११० रूपयांवर कायम आहे. तर प्रति किलो किंमत ११०००० रूपयांवर कायम आहे. जागतिक बाजारपेठेत चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.०१% वाढ झाली होती. तर भारतीय बाजारातील एमसीएक्समधील (MCX) चांदीच्या निर्देशांकात (Silver Indices) संध्याकाळपर्यंत ०.३३% वाढ झाल्याने दरपातळी १०७०६३ रूपयावर पोहोचली होती. जागतिक पातळीवर चांदीचा पुरव ठा मागणीपेक्षा मुबलक प्रमाणात असल्याने ही भाववाढ झालेली नाही.