उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी

  36

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा पहिलीपासून शाळेत सक्तीच्या करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच फाईलवर सही होती. शिउबाठा अर्थात उबाठानेच मराठीचा घात केला आहे. ही माहिती देणारे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत त्रिभाषा सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्याच सरकारने २७ जानेवारी २०२२ रोजी घेतला होता! डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा अनिवार्य करण्याची शिफारस केली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली होती. उद्धव सरकारच्या या निर्णयाची माहिती शिवसेनेने बॅनरद्वारे सर्वांना देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी 'उबाठानेच केला मराठीचा घात' असे बॅनर शिवसेनेने लावले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्रिभाषा सक्तीचा निर्णय मागे घेऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांनाच दिलासा दिला आहे.
Comments
Add Comment

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची