सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी २० स्वरुपात आशिया चषक क्रिकेट स्पर्धा बुधवार १० सप्टेंबरपासून सुरू होईल. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई हे सहा संघ स्पर्धेत सहभागी होतील. राजकीय तणावाचा क्रिकेट स्पर्धेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी भारत यजमान असूनही यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे.
सध्या भारत आणि इंग्लंड याच्यात इंग्लंड येथे पाच कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला आणि मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच बुधवार २ जुलैपासून एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे होत आहे. हा सामना जिंकून भारत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंड सलग दुसरा विजय मिळवत मालिकेतील त्यांची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. भारतीय वेळेनुसार दुसरा कसोटी सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे.