मुंबई: आदित्य बिर्ला ग्रुपचा ज्वेलरी ब्रँड इंद्रिया (INDRIYA) ने हिरेजडित कलेक्शन ‘आस्मानियत'सादर केले आहे, जे ब्रह्मांडाचे अलौकिक सौंदर्य आणि विशालतेमधून प्रेरित आहे असे कंपनीने म्हटले लाँचदरम्यान म्हटले आहे. प्रत्येक आभूषणामधून बारकाईने डिझाइन केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यामधील अलौकिकता दिसून येते. हे कलेक्शन तुमच्या दागिन्यांच्या संग्रहामध्ये खास जागा निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे असेही कंपनीने यावेळी म्हटले आहे.
कंपनीच्या माहितीनुसार,आस्मानियतमध्ये हार, इअररिंग्स, अंगठ्या आणि बांगड्या अशा विविध कलाकृतींचा संग्रह आहे .प्रत्येक डिझाइन काळजीपूर्वक आणि आपुलकीने बनवली आहे, ज्यामधून इंद्रिया हिऱ्यांची चमक दिसून येते. समका लीन पैलूंचा समावेश असलेल्या आस्मानियतमध्ये रात्रीच्या वेळी आकाशामध्ये दिसणाऱ्या अनेक रंगसंगतींचे अनुभव देणारी उत्कृष्ट, रंगीत रत्ने देखील आहेत, जेथे ट्वायलाइट ब्लूजपासून ते ऑरोरा हिरव्या रंगाच्या अलौकिक तेजाचा समावेश आहे. प्रत्येक आभूषणासह इंद्रिया भारतातील कारागिरी वारसा (Crafting Generation) साजरी करते, ज्यामध्ये पारंपारिक तंत्र आणि आधुनिक डिझाइनशैलीचे संयोजन आहे. समकालीन ते पाश्चात्य पेहरावांवर शोभून दिसण्यासाठी डिझा इन करण्यात आलेले आस्मानियत प्रत्येक उत्साहपूर्ण क्षणाला अधिक खास बनवते. आस्मानियत कॅम्पेनमध्ये जाहिरात सादर करण्यात आली ज्यामध्ये अदिती राव हैदरी आहेत. या जाहिरातीच्या निर्मात्या प्रतिष्ठित चित्रपट निर्माती अन्विता दत्त आहेत असे कंपनीने म्हटले.
जाहिरातीबाबत बोलताना कंपनी म्हटली, 'जाहिरात प्रेक्षकांना ब्रह्मांडामधील स्वप्नवत प्रवासावर घेऊन जाते. या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेली स्त्री हिऱ्यांची चमक पाहून भारावून जाते, जे रात्रीच्या वेळी आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे चमकतात. दूरवर असलेले तारे व आकाशगंगापासून ऑरोरा बोरेलिसच्या सौम्य तेजापर्यंत ही जाहिरात प्रेक्षकांना अलौकिक स्वप्नाचा अनुभव देते. प्रत्येक फ्रेममधून आकर्षकता दिसून येते, तसेच इंद्रिया हिऱ्यांना नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या कारागिरी व कल्पनाशक्तीचा अनुभव देते.'
कैंपेन लिंक-
लाँचबदल प्रतिकिया देताना, इंद्रियाचे मार्केटिंग प्रमुख शांतीस्वरूप पांडा म्हणाले,'आस्मानियतसह आम्ही ब्रह्मांडाच्या भव्यतेमधून प्रेरित वैभवशाली प्रवासाला सुरूवात केली आहे. या नवीन कलेक्शनमधील प्रत्येक आभूषणामधून आधुनिक काळातील महिलेची मोहकता व उत्साह दिसून येतो आणि दागिन्यांप्रती तिचे अतीव प्रेम दिसून येते. हे कलेक्शन महिलांना अद्वितीय मोहकतेसह स्वत:ला व्यक्त करण्यासाठी प्रेरणा देते, ज्यातून त्यांचा आत्मविश्वास व श्रेष्ठता दिसून येते आणि त्यांना जणू काही एका अलौकिक जगाचा भाग असल्यासारखे वाटते.'
इंद्रियाचे प्रॉडक्ट डिझाइन, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रमुख अभिषेक रस्तोगी म्हणाले,'आस्मानियत म्हणजे असाधारण आभूषणांचे कलेक्शन, ज्यामध्ये आकर्षक दागिने व ब्रह्मांडाच्या आश्चर्याचे संयोजन आहे. कल्पनाशक्ती व सखोलतेसह डिझाइन करण्यात आलेले हे कलेक्शन ब्रह्मांडाचा अनोखा अनुभव देते. प्रत्येक आभूषण बारकाईने डिझाइन करण्यात आले असून आपल्या सभोवताली असलेल्या रहस्यांना मानवंदना आहे. हे कलेक्शन परिधान करणाऱ्यांना या दागिन्यांचे तेज पाहून तारे पाहत असल्यासारखे वाटते. आस्मानियतसह तुम्हाला अलौकिक गोष्टीचा आणि ताऱ्यांच्या तेजाप्रमाणे दागिन्यांच्या तेजाचा अनुभव मिळेल.'
इंद्रियाचे उत्तर, दक्षिण व पश्चिम भारतात २५ स्टोअर्स आहेत, यापैकी दिल्लीमध्ये पाच स्टोअर्स, हैदराबादमध्ये चार स्टोअर्स, मुंबई व पुणे येथे प्रत्येक तीन स्टोअर्स,अहमदाबाद, जयपूर व पटणामध्ये प्रत्येकी दोन स्टोअर्स आणि इंदौर, सुरत, आंध्रप्रदेश व उत्तरप्रदेशमध्ये प्रत्येकी एक स्टोअर आहे.
इंद्रिया बाबत -
आदित्य बिर्ला ग्रुपचा ज्वेलरी ब्रँड इंद्रिया जुलै २०२४ मध्ये लाँच करण्यात आला. ‘पंचेंद्रिये' या संस्कृत शब्दामधून निर्माण करण्यात आलेल्या इंद्रियामध्ये कालातील आकर्षकता, अद्वितीय कारागिरी आणि लक्षवेधक संवेदी नुभवाचा समावेश आहे असा कंपनीचे म्हणणे होते. हिरे, मौल्यवान रत्ने व कलात्मक सोने यांच्या आकर्षक श्रेणीसह ब्रँड ज्वेलरी देतो, ज्यामध्ये पारंपारिक कला व आधुनिक आकर्षकता सामावलेली आहे. इंद्रिया स्टोअर्स (Indriya Stores) ज्वेलरी स्टोअरपेक्षा अधिक असून वधूच्या कलेक्शनसाठी, तसेच जीवनातील सर्वात आनंदमय क्षणांना साजरे करण्यासाठी अद्वितीय गंतव्य आहे असे कंपनीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते.वधूसाठी इंद्रिया बारकाईने डिझाइन केलेल्या वेडिंग ज्वेलरीचा खजिना आहे,जेथे प्रत्येक पीसमधून कालातीत वारसा दिसून येतो, ज्यामध्ये परंपरा व आधुनिकतेचे उत्तम संयोजन आहे. यामुळे प्रत्येक वधूला तिच्या जीवनातील खास दिनी आकर्षक दिसण्याची खात्री मिळते.
कंपनीच्या फिचर्सप्रमाणे, विवाहाव्यतिरिक्त, इंद्रिया दागिन्यांना वैयक्तिक ओळख व कलात्मकतेची अभिव्यक्ती म्हणून नव्या उंचीवर घेऊन जातो.