“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत


मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भाजपने माझ्यावर मोठे उपकार केल्याचे मनोगत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. मुंबईच्या वरळी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष म्हणून चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित या कार्यक्रमाला आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. सर्व आसन व्यवस्था फुल्ल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत फक्त रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरे कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पक्षातर्फे झालेल्या या घोषणेनंतर आपले मनोगत व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ‘भाजप ही माझी ओळख आहे. वर्ष २००२ मध्ये मी पक्षाच्या कामाला प्रारंभ केला. सामान्य कुटुंबातील माझ्यासारखा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होतो, हे अन्य कोणत्याच पक्षात होत नाही. या पक्षासाठी सर्वातोपरी कार्य करण्याचे धारिष्ट्य माझ्यात आहे.


भाजपची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आणि प्रभावी आहे. या विचारधारेला महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात पोचवण्याचे दायित्व आपले सर्वांचे कर्तव्य आहे. भाजपची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोचवत नाही, तोपर्यंत त्यांना ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचे काम कार्यकर्ता करू शकतो. भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आपणाला राष्ट्रीयत्त्वाचा विचार सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी वाहक व्हायचे आहे. वर्ष २०२९ चे लक्ष ठेवून कठोर कष्ट कार्यकर्त्यांना घ्यायचे आहेत. येणार्‍या काळात सर्वजण मिळून सक्षक्त भाजप निर्माण करण्यासाठी पावले उचलूया असे आवाहन त्यांनी केले.


रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. रविंद्र चव्हाण यांनी २००२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या सक्रिय राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत चव्हाण सेनेसह भाजपच्या प्रस्थापितांना मागे टाकून डोंबिवलीच्या सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या विरोधात झालेल्या स्वकीयांच्या बंडासह विरोधकांना न जुमानता चव्हाण हे २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग ४ वेळा आमदार बनले आहेत

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती