तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यातून आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींपैकी तीन जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यामुळे सिगाची केमिकल्समधील स्फोटामुळे ठार झालेल्यांची संख्या ३४ झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी ढिगाऱ्यातून ३१ मृतदेह काढण्यात आल्याचे आणि रुग्णालयात तीन जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सिगाची केमिकल्समधील दुर्घटनेची चौकशी होणार आहे.

कारखान्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना स्फोट झाला. रिअॅक्टर फुटला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. ही आग वेगाने पसरली. अनेकांना स्वतःला सावरण्याची, वाचवण्याची संधी मिळाली नाही.

स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात १५० जण होते. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या भागात ९० जण कार्यरत होते. स्फोटाचा आवाज येताच अनेकांनी वेगाने कारखान्याबाहेर धाव घेतली. पण झपाट्याने पसरलेल्या आगीमुळे ३४ जणांना जीव गमवावा लागला.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :