RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

  89

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन सुपर ॲप ‘RailOne’ लाँच केले आहे. या मोबाईल ॲपवर रेल्वे संबंधित सर्व सेवा एकाच जागी मिळणार आहेत. आता तिकीट बुकींग, ट्रेनची माहीती, प्लॅटफॉर्म तिकीट, तक्रार आणि फिडबँकसारख्या सेवा एकाच ॲपवर मिळणार आहे. चला तर या संदर्भात माहिती जाणून घेऊया...

काय आहेत RailOne ॲपची वैशिष्ट्ये?


आता प्रवाशांना सर्व सेवा एकाच ॲपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेनची स्थिती, पीएनआर स्टेटस, कोच पोझिशन, रेल्वे मदत आणि प्रवासासंबंधीत तक्रारी देण्याची सोय यासाठी वेगवेगळे ॲप डाऊनलोड करण्याची काही गरज नाही.

सिंगल साईन-ऑन फिचर


RailOne ॲपमध्ये एकाच लॉगिनवर सर्व सेवांचा लाभ मिळवता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची काही गरज राहणार नाही.

जुने युजर देखील लॉग इन करु शकणार


या ॲप्सचे जुने युजर असतील ते देखील लॉग इन करु शकणार आहेत, ज्या युजर RailConnect वा UTSonMobile या मोबाईल ॲपचा वापर आधीपासून करत असतील ते देखील आता RailOne ॲपवर लॉगिन करु शकणार आहेत.

R-Wallet सुविधा


या ॲपमध्ये रेल्वेच्या ई-वॉलेट अर्थात R-Wallet ची सुविधा देखील देण्यात आली आहे. युजर MPIN व बायोमेट्रिक कोडद्वारे लॉग इन करु शकणार आहेत.

नवीन रजिस्ट्रेशन देखील सोपे


आता नवीन युजरसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आलेली आहे. केवळ मोबाईल क्रमांक व OTP ने लॉग इन करणे आता शक्य होणार आहे.


इथे मिळेल ॲप


हे ॲप्स अँड्रॉईड मोबाईलमध्ये प्ले स्टोअर किंवा एप्पल मोबाईलमध्ये ॲप स्टोअर दोन्हींवर उपलब्ध आहे. आतापर्यंत रेल्वेच्या विविध कामांसाठी वेगवेगळे ॲप्स वापरले जात होत होते. आता मात्र एकाच एप्सवर सर्व सुविधा मिळणार आहेत.

आतापर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी IRCTC Rail Connect, जेवण ऑर्डर करण्यासाठी eCatering, तक्रारींसाठी Rail Madad, अनारक्षित तिकीट बुकींगसाठी UTS ॲप्स आणि ट्रेनची स्थिती माहिती करून घेण्यासाठी National Train Enquiry System सारख्या वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करावा लागत होता. RailOne या ॲपने या सर्व बाबींना एकाच ठिकाणी आणून रेल्वे प्रवास सोपा केला आहे.

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये ३ मोठे बदल?


रेल वन सुपर ॲप्सच्या लॉन्च बरोबरच, भारतीय रेल्वे यात्री रिझर्व्हेशन सिस्टममध्ये ३ मोठे बदल देखील केले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवास आणखीन सोपा केला आहे.

चार्ट तयार होण्याचा नवी वेळ


आधी चार्ट ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी तयार होत होता. परंतू नव्या नियमानुसार ट्रेनचा चार्ट ८ तास आधी तयार होणार आहे. दुपारी २ वाजता सुटणाऱ्या ट्रेनचा चार्ट रात्री ९ वाजता तयार होणार आहे. त्यामुळे वेटींग लीस्ट असलेल्या प्रवाशांना लवकरात-लवकर तिकीट कन्फर्म झाले का नाही ते कळेल.

तत्काल तिकीट बुकिंगमध्ये आधार व्हेरीफाईड अनिवार्य


१ जुलै २०२५ पासून केवल व्हेरिफाइड यूजर्सना तत्काल तिकीट बुक करता येणार आहे.

आधार व DigiLocker कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे असणार आहे. OTP आधारित व्हेरिफिकेशन जुलै अखेर पर्यंत लागू केले जाणार आहे.

रिझर्वेशन सिस्टममध्ये अपग्रेड ( डिसेंबर २०२५ पर्यंत ) 


रेल्वेची RailOne app, RailOne download, railway reservation system,Indian Railways app, IRCTC ticket booking, train status tracking, railway wallet R-Wallet, Tatkal booking update, train chart preparation, RailOne features, RailOne ॲप, भारतीय रेलवे ॲप, रेलवे टिकट बुकिंग, IRCTC ॲप तांत्रिक शाखा CRIS नवीन सिस्टमवर काम करीत आहे. आता एकाच वेळी १.५ तिकीट बुकिंगची क्षमता वाढणार आहे. दर मिनटांना ४० लाखाहून जास्त क्वेरी प्रोसेस होणार आहे. नवीन इंटरफेस अनेक भाषात असणार आहे. दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी विशेष सुविधा असणार आहेत.

 

 
Comments
Add Comment

Ajit Pawar : कारवाई थांबवा! अवैध कामावर छापा टाकणाऱ्या महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री पवारांचा दम, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या थेट आणि धडाडीच्या कामकाजासाठी ओळखले जातात.

...म्हणून मुंबईत कबड्डीपटूने केली आत्महत्या

मुंबई : वांद्रे परिसरात आई आणि भावासोबत राहणाऱ्या २० वर्षीय कबड्डीपटूने टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजारी असलेल्या

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले

दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक

मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील

नागपूरच्या एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट, १ मृत्यू तर १७ जण जखमी, ४ कामगारांची प्रकृती चिंताजनक

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी