नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

  28

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान


मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भाऊबंदकीच्या नात्याने परत येण्याचे आवाहन करत आहेत, परंतु त्यांनीच राज ठाकरेंना छळले होते.


राणे म्हणाले, "मला आठवते, याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची याना जाणिव नाही वाटतं."


राणे यांनी आरोप केला आहे की, "राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळविण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही."जो बूँद से गई वो हौद से नही आती" असा टोला ही खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे.



काय म्हणाले खासदार नारायण राणे


उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवते, याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची याना जाणिव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.





सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळविण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही. जो बूँद से गई वो हौद से नही आती। - खासदार नारायण राणे (माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री)

Comments
Add Comment

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७