LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त


नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. खरंतर, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करत भेट दिली आहे आणि दिल्ली ते मुंबईपर्यंत याची किंमत कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या सुधारित किमती आज, १ जुलै २०२५ पासून लागू झाल्या आहेत. यावेळी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर १४ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.




काय आहेत नव्या किंमती?



  • १ जुलैपासून लागू झालेल्या दुरुस्तीनंतर, दिल्लीत १७२३.५० रुपयांना उपलब्ध असलेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १६६५ रुपयांना मिळेल.

  • कोलकातामध्ये, १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत (Kolkata LPG Cylinder Price) १ जुलैपासून १८२६ रुपयांवरून १७६९ रुपयांवर आली आहे.

  • मुंबईत (Mumbai LPG Price) एलपीजी सिलिंडरची किंमत १६७४.५० रुपयांवरून १६१६.५० रुपयांवर आली आहे.

  • चेन्नईमध्ये १८८१ रुपयांना उपलब्ध असलेला सिलिंडर आता १८२३.५० रुपयांना मिळेल.



जूनमध्ये २४ रुपयांनी कपात


कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमती जूनच्या मागील महिन्यातही कमी करण्यात आल्या होत्या आणि १ जून २०२५ पासून हा सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. या कपातीनंतर, दिल्लीमध्ये कमर्शियल एलपीजी सिलिंडर (LPG Price In Delhi) १७२३.५० रुपयांवर आला होता, जो १७४७.५० रुपयांना उपलब्ध होता. याशिवाय, कोलकातामध्ये तो १८२६ रुपये, मुंबईत १६७४.५० रुपये (LPG Cylinder Price In Mumbai) आणि चेन्नईमध्ये १८८१ रुपयांवर आला होता. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य आणि इतर अनेक घटकांवरून केले जाते. जूनमध्येही तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २४ रुपयांनी कमी केली होती



हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाब्यांसाठी दिलासा


इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, भारतीय चलन रुपयाची स्थिती तसेच इतर बाजार परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचे दर सुधारित करतात. १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही कपात विशेषतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक संस्थांसाठी दिलासा देणारी आहे, जे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात.



घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत


सध्यातरी घरगुती ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. कारण घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत तशीच आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यात या सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. जी ८ एप्रिलपासून लागू झाली. तेव्हापासून, घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर राहिले आहेत. नव्या दरांनुसार मुंबईत घरगुती सिलेंडर ८५२.५० रुपयांना उपलब्ध आहे. सध्या कमर्शिअल LPG च्या दरात बदल करण्यात आला असून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)